Jalgaon Crime News : थोरगव्हाण शिवारातून नळ्या, पाइप लंपास

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon News : तालुक्यातील थोरगव्हाण येथील पथराळे शिवारात कपाशीच्या शेतातून पंधरा हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या व पाइप चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेतकरी विजय नवल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पथराळे शिवारातील शेतात कपाशीची लागवड केली आहे.(Tubes pipes busted from Thorgavan Shivar Jalgaon Crime News)

या कपाशी पिकास ठिबकच्या नळ्या जोडलेल्या आहेत. सालगडी चंद्रकांत रामसिंग चौधरी यास ६ जूनला पथराळे येथील दीपक धीवर यांनी तुमच्या शेतातील ठिबकच्या नळ्या व पाइप्स काढून घ्या असे सांगितले १० जूनला सालगडी चंद्रकांत चौधरी हे शेतात गेले असता त्यांना कपाशीस लावलेल्या पंधरा हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्या व पाइप कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळले.

विजय चौधरी यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत पथराळे येथील एकाच कुटुंबातील आठ सदस्यांविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. पोलिस कर्मचारी सिकंदर तडवी तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon News : चोपड्यात होणार राज्य उत्पादन शुल्कची नवी इमारत; साडेचार कोटींचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com