NMU Senate Election : सिनेटच्या 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMU News

NMU Senate Election : सिनेटच्या 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या १० सदस्यांच्या जागांसाठी २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

११ व १२ जानेवारी या दोन दिवसात ७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर १२ अर्ज अवैध ठरल्यामुळे ६५ अर्ज वैध ठरले होते.

१९ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. ६५ वैध अर्जांपैकी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले होते. त्यांचा एक अर्ज ग्राह्य धरल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात २१ उमेदवार कायम राहिले आहेत. (Twenty Seven candidates in competition for ten Senate seats NMU Authority Election Voting will be held in all four districts on 29th January Jalgaon News)

हेही वाचा: NMU Election News : विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार जाहीर, प्रचार सुरू

खुल्या संवर्गात १३ अर्ज माघारी घेतल्यामुळे ५ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागास संवर्गात ३ जणांनी माघार घेतल्यामुळे एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवतील. अनुसूचित जाती संवर्गात २ जणांनी माघार घेतल्यामुळे एका जागेसाठी ४ उमेदवार कायम राहिले आहेत.

तर अनु जमाती संवर्गात एकाने माघार घेतल्यामुळे एका जागेसाठी दोघांमध्ये सरळ लढत होईल. विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात एका उमेदवाराने माघार घेतल्यामुळे एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. तर महिला संवर्गात एकाने माघार घेतल्यामुळे एका जागेसाठी ४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. अशा एकूण १० जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: NMU Election : पदवीधर गटातून 12 अर्ज ठरले अवैध

२७ केंद्रांवर २९ तारखेस मतदान

२९ जानेवारीस जळगाव जिल्हयातील १७, धुळे जिल्हयातील ५ व नंदुरबार जिल्हयातील ५ अशा एकूण २७ मतदान केंद्रावरील ६० बुथवर मतदान होणार आहे अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

हेही वाचा: NMU Authority Election : संस्थाचालक गटात ‘विद्यापीठ विकास’ चे वर्चस्व

टॅग्स :JalgaonelectionpostSenate