
जळगाव : जुने जळगाव भागातील आंबेडकरनगरात सोमवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागली. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची अत्यावश्यक कागदपत्रे खाक झाली आहेत.
शहरातील जुने जळगाव भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील हिरालाल बाबूलाल बाविस्कर (वय ६२) आणि शरद भगवान सपकाळे यांच्या घरांना अचानक आग लागली. आग कशामुळे लागली, याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. (Two houses gutted due to fire in Ambedkar Nagar Jalgaon News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
मात्र, आगीमुळे शेजारी असलेले पार्टिशनच्या घरानेही पेट घेतला होता. आगीत दोन्ही घरातील संसारोपयोगी वस्तूंसह महत्त्वाची कागदपत्रे आदी सामान खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महारपालिकेचे दोन अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. आगीत दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिस भरतीची कागदपत्रे नष्ट
घर खाक झालेल्या हिरालाल बाविस्कर यांचा मुलगा अंकुश पार्ट-टाईम कंपनीत काम करून शिक्षण घेत आहे. पोलिस व्हायचे त्याचे स्वप्न असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिस भरतीची तयारी करीत होता. अंकुशला कामावर मिळालेले पैसे दोन दिवसांपूर्वीच घरात आणून ठेवले होते. आगीत त्याची महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि १८ हजारांची रोकड खाक झाली आहे.
तासाभरात आगिवर नियंत्रण
महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधीक्षक शशिकांत बारी, गिरीश खडके, युसूफ अली, नंदू खडके, मोहन भाकरे, रवी बोरसे, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.