लग्नाला आलेले दाम्पत्याचा अपघातात मृत्‍यू

Two persons met with an accident at Bhusawal and died on the spot.jpg
Two persons met with an accident at Bhusawal and died on the spot.jpg
Updated on

भुसावळ (जळगाव) : लग्नानिमित्त बुलढाणा येथून भुसावळात आलेल्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने कट मारल्याने गंभीर अपघात झाला. या अपघातात बुलढाणा येथील पती-पत्नीचा जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. ०४) सकाळी सव्वा आठच्या सुमारास खडका चौफुलीवर घडली. 

बुलढाणा येथील चंद्रकांत जगन्नाथ वराडे (वय 63) व संध्या चंद्रकांत वराडे (वय 56) हे भुसावळ शहरातील गडकरीनगरात नातेवाईकांकडील लग्न समारंभासाठी आले होते. गुरुवारी (ता. ०३) वराडे दाम्पत्याने शहरातील देना नगरातील नातेवाईकांकडे मुक्काम केला. यानंतर दुचाकी (एम.एच. 28, ए.एल. 6671) ने खडका रोडने गडकरी नगराकडे येण्यासाठी निघाले असता, खडका चौफुलीवर आले असता, भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने कट मारून दुचाकी घसरली व चंद्रकांत वराडे व संध्या वराडे हे दोघे पती पत्नी रस्त्यावर फेकले गेले. 

यानंतर दाम्पत्याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com