Jalgaon Crime News : नशिराबादला गोवंश कत्तल प्रकरणी दोघे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow

Jalgaon Crime News : नशिराबादला गोवंश कत्तल प्रकरणी दोघे अटकेत

नशिराबाद (जि. जळगाव) : येथे गोवंश कत्तल करून मांस विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. (Two Suspects arrested in case of cow slaughter in Nashirabad Jalgaon crime news)

हवालदार बाळू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास केला असता, नशिराबाद येथील कुरेशी मोहल्ल्यात राहत्या घरासमोर सार्वजनिक जागी मांस विक्री करताना आढळून आले.

पोलिसांनी शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४२) व जमील अहेमद शेख मुसा कुरेशी (वय ४५) यांना अटक केली. त्यांच्याकडून गोवंश मांस ७० किलो, एक लालसर रंगाचे कातडे व इतर साहित्य, असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके, पोलिस नाईक हेमंत मिटकरी, समाधान पाटील, किरन बाविस्कर, गणेश गायकवाड यांनी ही कारवाई केली. सहाय्यक फौजदार अलियार खान तपास करीत आहेत.