Unseasonal Rain : शहरासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे ‘संकट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain crisis of unseasonal weather again in  city district jalgaon news

Unseasonal Rain : शहरासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे ‘संकट’

जळगाव : अवकाळी पावसाने गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. (unseasonal rain crisis of unseasonal weather again in city district jalgaon news)

त्यापाठोपाठ आता १३ ते १७ मार्च दरम्यान पून्हा अवकाळी पावसाचे संकट ‘आ’वासून उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे.

‘पश्‍चिमी विक्षोभ’, आणि ‘अल निनो’ यामुळे पावसाचे वातावरण तयार होवून पाऊस पडेल असा अंदाज असल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली. समुद्रातील तापमान वाढल्याने पावसाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे अवकाळी पाऊस पडेल. जिल्ह्यात काही ठिकाणी १३ ते १५, तर काही ठिकाण १४ ते १७ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, दादर पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकतेच अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यात झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहु, मका, ज्वारी, सुर्यफुल, कांदासह केळी, पपई, मोसंबी लिंबूचा सामावेश होता.

कापूस पडून आणि...

आता पुन्हा अवकाळीचे संकट असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अगोदरच शेतकऱ्यांचा ऐंशी टक़्के कापूस घरात पडून आहे. कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळण्यासाठी शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र आहे.

सध्या साडेसात ते आठ हजाराचा कापसाला आहे. मात्र अधिकचा भाव मिळेल याआशेवर शेतकऱ्यांनी घरात कापूस साठविला आहे. खरिपातील उत्पादन खर्चही अजून निघालेला नाही. आता रब्बी हंगामावर अवकाळी दुसऱ्यांदा संकट येत आहे. यामुळे करावे तरी काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपूढे आहे.