Jalgaon News: महामार्गाचे अपग्रेडेशन, मनपाची आर्थिक पत सुधारावी; आर्किटेक्ट शिरीष बर्वेंचे आवाहन

City highways
City highwaysesakal

जळगाव : शहरातील महामार्ग व महापालिकेची आर्थिक स्थिती या दोन प्रमुख समस्या. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या सदोष चौपदरीकरणाच्या मर्यादा वर्षभराच्या आतच समोर आल्या आहेत.

त्यामुळे महामार्गाचे अपग्रेडेशन होणे आणि महापालिकेला आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या घरकुलांच्या जागा म्हाडाने ‘लॅन्ड बँक’ म्हणून घेत त्यातून चारशे कोटींचा निधी मिळू शकतो. जळगावचे विख्यात आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी हे दोन पर्याय पुन्हा नव्याने सूचवित भावस्पर्शी आवाहनही केलंय.

अचानक हे आवाहन करण्याला औचित्यही तसेच भावनिक आहे, श्री. बर्वे यांची शुक्रवारी (ता. २७) ‘ओपन हार्ट बायपास सर्जरी’ होणार होती, त्या शस्त्रक्रियेला जाता जाता त्यांनी सोशल मीडियातून ही भावनिक पोस्ट केली आहे. (Upgradation of highways financial credit of municipality should improved Architect Shirish Barves appeal Jalgaon News)

महामार्गाचा दोषपूर्ण अहवाल

तरसोद ते पाळधी यामधील शहरातून जाणारा १५ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण ६० मीटरचा भरतो हे वास्तव असताना, तो केवळ ४० मीटरच भरतो व त्यावर अतिक्रमण आहे, असा सदोष अहवाल तयार केला व महामार्ग शहराबाहेरून वळवून, शहरातून जाणारा महामार्ग संपूर्ण विकसित करण्यासाठी लागणाऱ्या ४५० कोटींची जबाबदारी गरीब जळगाव महापालिकेच्या माथी मारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोकळे झालेय.

जळगाव महापालिकेकडे पुरेशी गंगाजळी नसल्यामुळे शहरातील विकासकामे थांबल्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये कमालीचे नैराश्य आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

City highways
Nashik Crime News : भाई तुरुंगातून बाहेर आला अन् चक्क कारागृहासमोरच समर्थकांनी जल्लोष केला!

हे सूचविले उपाय

महामार्गाबाबत : पाळधी-तरसोदमधील जळगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण विकसित करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या कार्यकाळात ‘न्हाई’चे सल्लागार श्री. मालवीया यांनी तयार केलेला सुमारे ४५० कोटी रुपयांचा डीपीआर, २०१४ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद, पुणे पीठाने दिलेला निर्णय. यामुळे ‘न्हाई’ने शहरातील महामार्ग पूर्ण विकसित (अपग्रेड) करून देणे बंधनकारक आहे.

मनपाची आर्थिक स्थिती : महापालिकेच्या मालकीच्या घरकुलांच्या जमिनी, ज्या सुमारे ३५ लाख चौरस फूट आहेत. म्हाडाने त्या Land Bank म्हणून विकत घ्यायच्या. म्हाडा त्यासाठी जळगाव महापालिकेस एकरकमी ४०० कोटी देतील.

यांनी ठरविले तर शक्य...

जळगाव शहराच्या पुनरुज्जीवनासाठी या समस्या ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस चुटकीसरशी सोडवू शकतात. या तिन्ही मान्यवरांशी थेट संपर्क लाभलेली कर्तृत्ववान मंडळी आपल्या शहरात अनेक आहेत. गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची, असे भावस्पर्शी आवाहन श्री. बर्वे यांनी केले आहे.

City highways
Shivputra Sambhaji Mahanatya: लोकाग्रहास्तव शिवपुत्र संभाजी महानाट्याचे दोन प्रयोग वाढवले : डॉ.अमोल कोल्हे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com