Jalgaon Sand Crime : अवैध वाळू वाहतुकीचा ‘रात्रीस खेळ चाले’; वरणगावात वाहनांची रात्रभर घर्र..घर्र

जिल्ह्यात वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.
Varangaon (T. Bhusawal) : A sand pile in front of a building.
Varangaon (T. Bhusawal) : A sand pile in front of a building.esakal

Jalgaon Sand Crime : जिल्ह्यात वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. वाळूमाफियांच्या वाहनांवर कारवाईसाठी महसूल प्रशासनासह आरटीओ आणि पोलिस प्रशासनाला देखील विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

मात्र, वरणगाव येथे रात्रीच्या वेळी वाळूची खुलेआम ५० वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू असताना स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळू वाहतूकदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.(Varangaon illegal sand is being transported openly at night jalgaon sand crime news)

रात्रभर वाळूची वाहतूक सुरू आहे. या वाळू वाहतूदारांना कोणाचेच भय नसल्याने त्यांना चांगलेच फावत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वरणगाव परिसरात क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात शासकीय व खासगी बांधकामे सुरू असून, या बांधकामांना गिरणा आणि तापी नदीच्या वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने वाळूमाफिय रात्रीच्या वेळी वाहतूक करीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीसंदर्भात कडक निर्बंध घातले आहेत. वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी आरटीओ आणि पोलिस प्रशासनाला कारवाईबाबत विशेष अधिकार देखील देण्यात आले आहे.

मात्र वरणगाव येथे पोलिस ठाण्यासमोरील जुन्या महामार्गावरून दररोज रात्रीची वेळ साधून वाळूच्या किमान ५० गाड्या वाळू वरणगाव आणि परिसरातील भागात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन येत आहेत.

पण महसूल अधिकारी आणि पोलिसांची मात्र डोळेझाक होत आहे. यावर कारवाई करण्यासाठी संबंधितांकडूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने शहरात होणाऱ्या विनापरवाना वाळू वाहतुकीला अभय तरी कोणाचे? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

Varangaon (T. Bhusawal) : A sand pile in front of a building.
Jalgaon Sand Crime News : अवैध वाळूउपशा प्रकरणी 2 कोटींचा दंड वसूल : जिल्हाधिकारी प्रसाद

शासनाचा कोट्यवधीचा बुडतोय महसूल

अवैध वाळू वाहतूक व विक्रीचा धंदा ‘रात्रीस खेळ चाले’ म्हटल्याप्रमाणे बिनधास्तपणे चालतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस, परिवहन, महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना कारवाईसंदर्भात विशेष अधिकार देऊन संयुक्त तैनात केले आहे.

मात्र या तीनही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कसलाही प्रभाव पडत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. यावर कारवाई करण्यासाठी संबंधितांकडूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने वाळू वाहतुकीला अभय तरी कोणाचे? असा प्रश्न विचारला जात आहे.

''वरणगाव आणि परिसरात वाळू वाहतुकीबाबत आम्ही पथकासोबत विविध ठिकाणी कारवाई केली आहे. वाळूचे वाहन आढळल्यास कार्यवाही करीतच आहोत. येथील बसस्थानक चौकाजवळील व्यापारी संकुलाच्या बांधकामावर ठिकठिकाणी वाळूचे ढिग असल्याचे माहित झाले. चौकशी करून पंचनामा केला जाईल.''- मंगेश पारिसे, तलाठी, वरणगाव (ता. भुसावळ)

Varangaon (T. Bhusawal) : A sand pile in front of a building.
Jalgaon Sand News : अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध ग्रामस्थांचा ‘एल्गार’; वाहतुकीचा रस्ता जेसीबीने खोदला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com