
Jalgaon News : त्या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश..
मोहाडी : मागील ८ दिवसापासुन मांडेसर शेतशिवारात लपुन बसलेल्या वाघाला बुधवारला सायंकाळी पकडण्यात यश आल्याने वनविभागाच्या कर्मचा-यासोबतच गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मांडेसर- कान्हळगाव शेतशिवारात मागील आठवडयात काही शेतक-याना वाघ दिसल्याचे सांगण्यात आले. त्याकरीता वनविभागाच्या कर्मचा-यानी शहानिशा करण्याकरीता परीसरात शोध घेतले असता त्यांना वाघाचे पगमार्क आढळुन आले.
ही वार्ता परीसरात पसरल्याने भितीमुळे शेतशिवारात शेतकरी व मजुरांनी जाणे बंद केले होते...त्यामुळे मिरची,टमाटर व फळबागा उत्पादक शेतक-यांना नुकसान सहन करावा लागत होता.आज सकाळी मांडेसर येथील बालचंद दमाहे याच्या शेतात सकाळी वाघ दिसुन आल्याने भितिचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याकरीता वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वनविभागाने रेस्कु आँपरेशन सुरु केले पण वाघ पाहणा-या लोकांच्या गोंगाटामुळे वाघ पक़डण्यात अडचण येत होती..त्याकरीता पोलीस विभागाला पाचारण करण्यात आले..पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाघाला पकडण्यात यश आले. यात मात्र लोकांच्या जमावामुळे व चालण्यामुळे बागाचे नुकसान झाले हे विशेष.