
आईसह अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य; 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसह तिच्या आईसोबत अश्लील चाळे (Vulgar Behaviour) करून चापट बुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. (vulger behaviour to mother with minor daughter Charges filed against 6 jalgaon crime News)
शहरातील अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना तिचा पाठलाग करून तन्वीर शेख शब्बीर हा नेहमी त्रास देत होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे तुही माझ्यावर प्रेम कर, अन्यथा पळवून नेईल, अशी धमकी गेल्या दोन महिन्यांपासून तन्वीर शेख शब्बीर या अल्पवयीन मुलीला देत होता. दरम्यान, गुरुवारी (ता. २) अल्पवयीन मुलगी व तिची आई सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरात बसलेली असताना सरफाज शेख रफिक मनियार, दानिश शेख रशीद मनियार, मोहसिन शेख मनियार, रशीद शेख रसूल मनियार, तोहिद शेख (पूर्ण नाव माहित नाही) व तन्वीर शेख शब्बीर आदींनी घरात घुसून अल्पवयीन मुलीसह तिच्या आईचा हात पकडून शिवीगाळ केली.
हेही वाचा: Dhule : तशा ‘मेसेजेस’पासून दूरच राहा पोलिस अधीक्षक पाटील यांचे आवाहन
त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य करून कपडे फाडले व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या वडील व भावालाही त्यांनी चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बाहेर येऊन लोखंडी रॉडने दुचाकीची तोडफोड केली. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.
हेही वाचा: शहरातील रस्ते कामांमुळे वैताग; मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत
Web Title: Vulgar Behaviour To Mother With Minor Daughter Charges Filed Against 6 Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..