जळगाव - खानदेशातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या एकूण साठा सुमारे ४५ टक्क्यांवर आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा केवळ ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे..नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि एरंडोल भागाला होतो. धरणातून आतापर्यंत पिकांसाठी तीन आवर्तने देण्यात आली असून टंचाई निवारणासाठीही तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे..१८ टीएमसी क्षमतेच्या या धरणात मागील चार वर्षांपासून शंभर टक्के साठा होता. मात्र कृषी, पिण्याचे पाणी आणि टंचाई निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागत असल्याने यंदा जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव शहरांनाही या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा पट्ट्यातील बहुळा, मन्याड, अंजनी, बोरी आणि अग्नावती हे प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र सध्या या प्रकल्पांतील जलसाठा ५० टक्क्यांखाली आला आहे. भोकरबारी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नव्हता..सातपुडा परिसरातील मंगरूळ, अभोरा, सुकी, गारबर्डी आणि मोर प्रकल्पांमधील साठाही घटला असून तो सुमारे ५२ टक्क्यांवर आला आहे. चोपडा तालुक्यातील गूळ प्रकल्पातही फक्त ४५ टक्के साठा शिल्लक आहे. तापी नदीवरील हतनूर आणि वाघूर नदीवरील वाघूर प्रकल्पातील जलसाठ्यातही घट झाली आहे.वाघूर प्रकल्पातील साठा ५५ टक्क्यांवर, तर हतनूर प्रकल्पातील साठा ४८ टक्क्यांवर आला आहे. हतनूर प्रकल्पातून भुसावळ शहर, दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प आणि वरणगाव आयुध निर्माणीला पाणीपुरवठा केला जातो. तसेच चोपडा, यावल आणि रावेर भागातील रब्बी पिकांसाठी तीन आवर्तने दिली जातात..हतनूर प्रकल्पात ५४ टक्के गाळ साचल्याने त्याची प्रत्यक्ष जलसाठवण क्षमता निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे मेअखेरपर्यंत या प्रकल्पातील साठा तळ गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाघूर प्रकल्पातून जामनेर आणि जळगाव शहरांसह रब्बी हंगामासाठीही पाणीपुरवठा केला जात असल्याने डिसेंबरनंतर साठा सातत्याने कमी होत आहे..प्रकल्पांची सद्यःस्थितीप्रकल्प - ध्याचा जलसाठागिरणा धरण - ३१हतनूर प्रकल्प - ४८वाघूर प्रकल्प - ५५सातपुडा प्रकल्प - ५२गूळ प्रकल्प - ४५अनेर, पांझरा, बुराई - ५२दरा, सुसरी - ४९.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.