हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

closed well was pumped out by villagers

हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील हिंगोणा येथे दलित वस्ती बेघर प्लॉटमधील गंभीर असलेली पाणी समस्या (Water crisis) ही कायम स्वरूपी मिटणार आहे. (water problem in Hingona will be solved forever Jalgaon News)

हेही वाचा: यावल कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी मोहीम

सरपंच रुखसाना तडवी, ग्रा. पं. सदस्य शांताराम तायडे, सदस्या कुसूमबाई तायडे, श्याम महाजन, किशोर सावळे, विष्णू महाजन, छबू खुदा तडवी, भरत नेहेते यांच्या प्रयत्नाने दलित वस्तीमध्ये लक्ष देउन प्राथमिक आरोग्य केद्र येथे असलेली बंद विहिर पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन उपसा केला. यामुळे बेघर प्लॉटचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. आठ दिवसांपासून नव्याने रुजू झालेले प्रभारी ग्रामविकास अधिकारी आर. टी. बविस्कर यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य शांताराम तायडे, व कुसूम तायडे यांनी लेखी स्वरूपात दलित वस्तीच्या पाणीसंदर्भात तक्रार केली होती. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन या समस्येचा पाठपुरावा करून बंद असलेली विहिरीचा उपसा केल्यामुळे गावात कौतुक होत आहे.

हेही वाचा: एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी

Web Title: Water Problem In Hingona Will Be Solved Forever Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..