Jalgaon District Water Scarcity
sakal
जळगाव - ‘अल निनो’च्या प्रभावाने यंदा मॉन्सून लांबतोय. दुसरीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल होत चालली आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरी आटल्या आहेत. जिल्ह्यात काही अंशी तापमानात घसरण झाली असली तरी उष्ण वाऱ्यांसह आर्द्रतेमुळे प्रकल्पामधील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे.