Jalgaon : सतरा मजलीत पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतच पाणीटंचाई दिसून आली.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : ‘यह क्या जनता को पाणी पिलाएंगे, ये तो खुदही प्यासे है’ या हिंदी शेरची आठवण व्हावी, असा प्रकार बुधवारी (ता. २५) महापालिकेत दिसून आला. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतच पाणीटंचाई दिसून आली. कर्मचारी अक्षरश: बाटल्या घेऊन थेट इमारतीखाली धावपळ करताना दिसत होते. (Water shortage in Jalgaon municipal corporation)

सतरा मजली इमारतीत पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. थंड पाण्याचे कुलर असून, त्याद्वारे काही मजल्यांवर पाण्याची सुविधा केली आहे. विशेषत: पाचव्या, आठव्या, दहाव्या, व तेराव्या आणि सतराव्या मजल्यावर पाण्याचे नळ बसविले आहेत. खालच्या बहुतेक मजल्यावरील कर्मचारी पाचव्या मजल्यावर नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून नेत असतात. प्रत्येक विभागात या नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून ठेवण्यात येते.

Jalgaon Municipal Corporation
जळगाव : फुले मार्केटचे अतिक्रमण हटविण्यासाठी पत्राचा अजब खेळ

चक्क पिवळसर पाणी

सतरा मजली इमारतीत बुधवारी सकाळी पाणी आले. मात्र, ते पिवळसर असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी पाणी भरलेच नाही. मात्र, दुपारी बारानंतर नळाचे पाणी बंद झाले. प्रत्येक विभागातील कर्मचारी बाटल्या घेऊन लिप्टमधून या मजल्यावरून त्या मजल्यावर धावाधाव करीत होते. मात्र, ज्या मजल्यावर पाण्याची सुविधा होती, त्या मजल्यावरील नळांना पाणीच नव्हते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सतरा मजली इमारतीच्या खाली जाऊन पाणी आणले. सायंकाळपर्यंत या नळांना पाणी आलेच नव्हते. सतरा मजली इमारतीतील पाणी का बंद होते. याबाबत मात्र कुणीही माहिती देऊ शकले नाही. अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते, तर काही नगरसेवकही होते. मात्र, सर्वजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. कर्मचाऱ्याच्या या धावपळीची कोणी दखलही घेतली नाही. आपल्याच कार्यालयातील पाणीटंचाईची दखल न घेणारे अधिकारी व पदाधिकारी जनतेची किती दखल घेणार हाच प्रश्‍न आहे. ‘दिव्या खाली अंधार’, असाच प्रकार बुधवारी सतरा मजली इमारतीत दिसून आला.

Jalgaon Municipal Corporation
जळगाव : रस्त्यांची दुर्दशा, त्यात दोषपूर्ण कामांनी नागरिकांचे हाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com