Jalgaon Water Supply News : शहरात पाणीपुरवठा बंद राहणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply stop

Jalgaon Water Supply News : शहरात पाणीपुरवठा बंद राहणार!

जळगाव : मेहरूणच्या डी मार्ट चौकातील अमृत योजनेची जलवाहिनी पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी (ता. ५) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water supply will be closed in city Jalgaon Water Supply News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र

मेहरूणमधील डी मार्ट चौकातील अमृत योजनेंतर्गत टाकलेली जलवाहिनी आकाशवाणीच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला असून,

शुक्रवारी (ता. ६) व शनिवारी (ता. ७) होणारा पाणीपुरवठाही अनुक्रमे एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, तो शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८) करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेचे पाणीपुरवठा उपअभियंता संजय नेमाडे यांनी केले आहे.

हेही वाचा: Nashik News : सुरगाणा ठरतोय स्ट्रॉबेरी पंढरी! चांगल्या उत्पादनाने आदिवासींचे स्थलांतरही थांबले