Jalgaon Crime News : अंगणात झोपणे पडले महागात

Crime News
Crime Newsesakal

Jalgaon News : वावडदा (ता. जळगाव) गावातील ४८ वर्षीय महिलेस अंगणात झोपणे महागात पडले. झोपेत असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसुत्र, पोत असे एकूण १४ ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले.

सध्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगणात किंवा गच्चीवर झोपण्याचा मोह आवरता येत नाही. (While Old Women sleeping thieves took away jewellery weighing 14 grams from her neck like mangalsutra pot Jalgaon Crime News)

वावडदा गावात आशाबाई मुरलीधर जाधव (वय ४८) ही शेतकरी महिला शुक्रवारी (ता. १६) रात्री अंगणात झोपली असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र आणि पोत असे १४ ग्रॅम वजनाचे दागिने अलगदपणे काढून घेतले.

सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात येताच शोधा-शोध केली.त्यावर आशाबाईंनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon Crime News : कार्यकर्त्यांच्या गर्दीत भरली ‘चोरांची शाळा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com