Jalgaon Crime : कौटुंबिक वादातून पत्नीचा निर्घृण खून; कोयत्याने मानेवर केले सपासप वार, संशयित गजाआड

एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीने कौटुंबिक वादातून कोयत्याने सपासप वार करून केला निर्घृण खून.
Nashirabad Killed Case

Nashirabad Killed Case

sakal

Updated on

नशिराबाद (ता. जळगाव) - येथील भवानीनगर भिल्ल वस्ती परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीने कौटुंबिक वादातून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (ता. २२) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडली. खंडेराव मंदिर परिसरात घडलेल्या या भीषण घटनेमुळे खळबळ उडाली असून, परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले. मंदाबाई विकास जाधव (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती विकास जगन्नाथ जाधव (वय ३२) याला ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com