Latest Marathi News | आठवडेबाजाराचा भाजीपाला पडला महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 gold jewelry theft  Gang

jalgaon : आठवडेबाजाराचा भाजीपाला पडला महागात


जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात दर बुधवारी आठवडे बाजरा भरतो. या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेची ५० हजार रुपयांची मंगलपोत चेारट्यांनी तोडून नेली आहे. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरा जवळील वाघोदे नगरातील कल्पना संजय पाटील (वय- ३०) या बुधवारी भाजीपाला खरेदी करण्यााठी पिंप्राळ्यात भरणार्या आठवडे बाजारात आल्या होत्या.(woman Necklace theft in vegetable market jalgaon crime news pvc99)

हेही वाचा: Jalgaon : निसर्गटेकडी परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास

बाजार करत असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगलबोत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.

प्रकार समोर आल्यानंतर कल्पना पाटील यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश्‍ चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon : पोलिस ठाण्याबाहेरच महिलेचा विषप्राशनाने मृत्यू