
बचत गटांच्या महिलांनी आठ दिवसांत दीड लाख रुपये करवसुली करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल अमळनेर पंचायत समिती मार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.
कळमसरे : ता.अमळनेर तालुक्यातील पिंपळी प्र.ज. ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी ची थकबाकी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. यातच कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ग्रामपंचायतींनी मास्क ,सॅनिटायझर आणि फवारणी साठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने ग्रामपंचायतींची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे.
आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी अजून बाकी
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे नियमित वेतन व भत्ते देण्यात येत नाहीत.पंचायतराज संस्था कडे शासनाने वर्ग केलेली 29प्रकारची कामे करण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम नसल्याने अमळनेर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियाना अंतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी 100%घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या पाश्र्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील पिंपळी प्र.ज. येथील बचत गटांच्या महिलांनी आठ दिवसांत दीड लाख रुपये करवसुली करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल अमळनेर पंचायत समिती मार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपळी प्र.ज. येथील १००% घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरणा-या नागरिकांचाही पंचायत समिती मार्फत सन्मान करण्यात आला.
वाचा- शेतकरी अडचणीत; कापूस खरेदी केंद्राचे घोडे अडले कुठे ?
उपायोजना नसल्याने थकबाकी
डिसेंबर महिना येऊनही घरपट्टी व पाणीपट्टी वसुली चे प्रमाण अत्यंत कमी आहे तरी करांच्या थकबाकी वसुली साठी काही तरी ठोस उपाययोजना नसल्याने अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे.
आठ दिवसात दिड लाखाच्यावर वसुली
तालुक्यातील पिंपळी गावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी दीड लाख करवसुली केल्याने गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सत्कार करून कौतुक केले आहे.
आवर्जून वाचा- जळगावकर सावधान ः थंडीचा जोर वाढताच चोरटे सक्रिय, तीन ठिकाणी घरफोड्या
करवसुलीसाठी अशा उपाययोजना
- ग्रामसेवक, सरपंच यांनी करवसुली साठी महिला बचत गटांची करार तत्वावर नेमणूक करावी.
- सर्व ग्रामसेवक, सरपंच व प्रशासक यांनी मासिक सभेत सदर निर्णय घ्यावा.
- कर वसुली काम देण्यापूर्वी बचत गटाच्या सर्व सदस्यांची करभरणा झालेला असावा.
- बचत गटांना देण्यात येणारा मोबदल्याचा दर हा नियमित असावा.
- .ग्रामसेवक व सरपंच यांनी करभरणा बॅंकेत करून च बचत गटांना निधी चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने अदा करावा
संपादन- भूषण श्रीखंडे