सफाईचा गंभीर प्रकार; चोकअप काढण्यासाठी कामगार उतरला गटारात

गटारात उतरलेला कर्मचारी नंतर आजारीही पडल्याची माहिती समोर आली आहे.
Worker
Workeresakal
Summary

क्या करे...पापी पेट का सवाल है साहब
गंधे पानी से भी रोटी की खुशबू आती है

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंदिस्त गटारात सफाई कामगारांना उतरवले जात असल्याचा गंभीर प्रकार बळीरामपेठेत परिसरात नुकताच घडला. गटारात उतरलेला कर्मचारी नंतर आजारीही पडल्याची माहिती समोर आली आहे.
गटारांची स्वच्छता व मैला साफ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व केंद्र सरकाने कठोर कायदा पारित केला असतानाही मनपातर्फे सर्रास कायद्याचे उल्लंघन होत आहे.

बळीरामपेठेतील प्रकार

शहरातील बळीरामपेठ भागात जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे चोकअप झालेल्या गटारांचे पाणी वाहते करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. प्लॅस्टीक कचरा आणि गटारात टाकल्या जाणाऱ्या घाणीमुळे गटार पूर्णतः चोकअप झालेली असल्याने सुरवातीला कामगारांनी बांबू टाकून नंतर, लोखंडी गज टाकून उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही.

Worker
जळके-लोणवाडी रस्त्यावर वृद्धाला गंडवले

कामगारालाच उतरवले

अखेर या जीवघेण्या खड्ड्यात अधिकाऱ्यांच्या देखत चक्क कामगाराला उतरवण्यात आले. अधिकारी आणि त्याचे सहकारी रोजचेच काम म्हणून गटार सफाईचा हा जिवघेणा तमाशा बघत होते.


सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने वर्ष-२०१३ मध्ये या बाबत कठोर निर्देश दिले असताना सर्रासपणे धोकादायक नाले सफाईत कामगारांना उतरवण्याचे पाप जळगाव महापालिका आरेाग्य विभाग आणि प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कायदा काय सांगतो...

सरकारने २०१३ मध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग (हातानं मैला उचलणं) प्रतिबंध आणि पुनर्वसन अधिनियम लागू केला आहे. त्यात सरकारने ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर’ची व्याख्या स्पष्ट केली आहे. त्यानुसार ‘एखाद्या व्यक्तीला स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मानवी मल-मूत्र जमा होत असेल अशा मोकळ्या नाल्या, गटारं किंवा खड्डे स्वच्छ करायला लावल्यास, त्या व्यक्तीस मॅन्युअल स्केव्हेंजर म्हटलं जाईल.’ या कायद्याच्या तिसऱ्या भागातील सातव्या मुद्द्यानुसार कोणताही स्थानिक अधिकारी किंवा दुसरा कोणताही व्यक्ती, इतर कोणालाही सेप्टिक टँक किंवा गटारात धोकायदायक असेल असे, स्वच्छतेचं काम सांगू शकत नाही. या कायद्यात मैला साफ करणारे सफाई कर्मचारी, सेप्टिक टँक आणि गटारींच्या संदर्भात ‘धोकादायक स्वच्छता’ म्हणजे काय, हेही स्पष्ट केलं आहे.

Worker
2 लाखांचे ठिबक सिंचनाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

सुरक्षा साधनेच नाहीत

स्वतःच्या जिवाशी खेळणाऱ्या या कामगारांना महापालिका कुठलेच सुरक्षा उपकरणे पुरवत नाही, हा अतिगंभीर प्रकार समोर आला असून प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे.

‘तो’ कामगार आजारी

जळगाव मनपाचे अधिकारी, कर्मचारी व मुकादम यांच्या उपस्थितीत या तरुणाला गटारीत उतरविल्यानंतर तो, आजारी पडला. त्याने गल्लीतीलच डॉक्टरकडे औषधोपचार केल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com