
जळगाव : रस्त्यावरील चुकीला माफी नाही : सोमनाथ वाकचौरे
भुसावळ - भारत हा सर्वात जास्त अपघात होणारा देश आहे. एका दिवसात भारतात अपघातामध्ये ४१४ लोक मृत्यूमुखी पडतात, तर एका तासात १७ लोक मृत्यूमुखी पडतात. भारतातील अपघात मृत्यूचे प्रमाण त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, ‘रस्ता चांगला असून चालत नाही रस्त्याचे नियम माहीत असले पाहिजे, रस्त्याचे नियम माहीत नसल्यास रस्ते मृत्यूचा सापळा बनतात. ‘रस्त्यावरील चुकीला माफी नाही. त्यामुळे जबाबदारीने वाहतुकीचे नियम पाळणे, जीवितासाठी आवश्यक असल्याचे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी केले.
येथील नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील शिस्त समिती व वेल्सपन ग्रुप यांच्यातर्फे ‘वाहतुकीचे नियम व रोड सेफ्टी’ या विषयावर कार्यशाळा झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील हे होते. मंचावर प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, नाम्रपाली गोंडाणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. इ. भंगाळे, उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा शिस्त समिती प्रमुख प्रा. डॉ. अनिल हिवाळे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. ए. सोळुंके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अनिल हिवाळे यांनी मानले.
गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी वाहतूक कायदा स्पष्ट करून तरुणांमध्ये कायद्याबाबत उदासीनता असल्याचे सांगितले. वाहतूक नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसणे, हेल्मेट न घालणे, लायसन्स नसणे अशा महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. वाहतूक नियम पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोस्टर बनवण्याबरोबरच त्यातील विचार अंगीकारणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले. शेवटच्या सत्रात समारोप कार्यक्रम व बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी होते.
Web Title: Workshop On Traffic Rules And Road Safety Dysp Somnath Wakchaure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..