विहिरीजवळ पाण्यासाठी गेले अन् सर्पदंशाने घेतला प्राण

शेती काम करीत असताना २५ वर्षीय युवकाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे.
Most deaths due to snake bites in Odisha
Most deaths due to snake bites in Odishasakal
Updated on


पाचोरा (जि. जळगाव) :
शेवाळे (ता. पाचोरा) येथील २५ वर्षीय युवकाचा शेती काम करीत असताना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची घटना काल (ता. १७) घडली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रवीण निकम असे मृत युवकाचे नाव असून ते डोंगरगाव शिवारातील आपल्या शेतात बाजरी कापणीसाठी गेले होते. विहिरीजवळ पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना विषारी सर्पाने दंश केल्याने ते बेशुद्ध पडले. बराच वेळ झाला तरी ते परत येत नाही म्हणून त्यांचे भाऊ एकनाथ निकम हे त्यांना पाहण्यासाठी गेले असता, ते विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. मयत प्रवीण निकम यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

Most deaths due to snake bites in Odisha
जळगाव : कर्जबाजारी शेतकऱ्याची आव्हाणेत आत्महत्या
Most deaths due to snake bites in Odisha
14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com