Latest Marathi News | ATM कार्ड बदलून घातला तरुणाला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

ATM कार्ड बदलून घातला तरुणाला गंडा

जळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या तरुणाला अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवून एटीएम कार्डची अदलाबदली करून खात्यातून ३७ हजार ५०० रुपये काढून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हापेठ पोलिस गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: अजित पवारांचे CM शिंदेंना पत्र; काय म्हटलं आहे पत्रात?

विठ्ठल मेरचंद पवार (वय ३८, रा. गजानन महाराज मंदीर, सुप्रिम कॉलनी) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजळील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत आला होता.

हेही वाचा: CM Eknath Shinde: 'माझ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या शिंदेच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला

बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढत असताना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या एटीएमची अदलाबदली केली. त्यानंतर पैसे निघाले नाही, म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला. थोड्यावेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ३७ हजारर ५०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Young Man Fraud With 3 Lakh Rupees By Exchange Atm Card

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..