हनुमंतखेडा येथे वीज पडून तरुण ठार

हा तरुण आपल्या शेतात कापूस पिकासाठी सऱ्या पाडण्याचे काम करत होता.
Death
Death esakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथे अंगावर वीज पडल्याने २० वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) घडली. किशोर पवार असे मृत तरुणाचे नाव असून ते आपल्या शेतात कापूस पिकासाठी सऱ्या पाडण्याचे काम करत असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने ते काका व चुलत भावासह जवळच्या झाडाखाली थांबले.

पाऊस थोडा कमी झाल्याने काका व चुलत भाऊ हे घराकडे परतले त्यानंतर थोड्याच वेळात मोठ्याने आवाज होऊन झाडावर वीज कोसळली त्यात किशोर पवार हे जमिनीवर कोसळले व मृत झाले त्यांच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. त्यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. मयत किशोर पवार यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार असून पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिसांकडे वर्ग केली आहे.

Death
जळगाव : वीज पडून बैल ठार, दोघे जखमी
Death
स्मार्ट वॉच स्कॅन करुन खरंच Paytmमधून पैसे काढले जातात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com