Latest Marathi News | पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon News : पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. जानकीनगरमधील तुषार हिरामण सोनवणे (वय २४) याने पोलिस भरतीसाठी अर्ज केला असून तो, भरतीसाठी विविध प्रकाराचा सराव करत आहे. शनिवारी (ता. २४) तुषार पोलिस कवायत मैदानावर धावण्यावरून पोलिस वसाहतीतील अविनाश पाटील याच्यासोबत त्याचा वाद झाला.

अविनाश व त्याच्या इतर दोन मित्रांनी तुषार सोनवणे याला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले. उपचारानंतर तुषारच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक तुषार जावरे तपास करत आहे. (Young man practicing police recruitment was brutally beaten Jalgaon News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

हेही वाचा: Nashik News : पुना रोडवरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

दरम्यान, पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील तरुणांचा महाविद्यालय, क्लासेसमध्ये आपसांत वाद-भांडण झालेले असते. सरावासाठी आलेल्या बाहेरील तरुणांचा पूर्वीचा वाद कवायत मैदानावर काढला जातो.

तो पोलिस मैदानावर कसा काय येतोय, असे म्हणत पोलिस वसाहतील तरुण बाहेरून आलेल्या तरुणांना मारहाण करून पिटाळून लावतात. मारहाणीच्या घटनेनंतर जिल्‍हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये कवायत मैदान आणि मुख्यालय परिसरात बाहेरच्या कुठल्याही खासगी व्यक्तीस प्रवेश नाकारण्यात आला आहे, तसेच कवायत मैदानावर व्यायाम करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

हेही वाचा: Nashik News : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा Action Plan