Latest Marathi News | पंढरपूर वारीतून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू; किनगावात हळहळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

पंढरपूर वारीतून परतणाऱ्या युवकाचा अपघातात मृत्यू; किनगावात हळहळ

यावल (जि. जळगाव) : पंढरपूर येथे विठ्ठलापुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेऊन घराकडे परतणाऱ्या तालुक्यातील किनगाव येथील १७ वर्षीय युवकास मृत्यूने गाठले. तालुक्यातील किनगाव- जळगाव मार्गावर भरधाव डंपरने प्रवासी ॲपेरिक्षाला जोरदार धडक देत झालेल्या अपघातात किनगाव येथील १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १२) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

याबाबत असे, तेजस प्रकाश तायडे (वय १७, रा. किनगाव, ता. यावल) हा अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर येथे गेला होता. पंढरपूरहून परल्यानंतर तो मंगळवारी (ता. १२) सकाळी जळगाव येथून घरी किनगाव येथे येण्यासाठी ॲपेरिक्षाने बसला. धामणगाव फाट्याजवळ पेट्रोलपंपासमोरून प्रवासी रिक्षा जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने प्रवासी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिली.

हेही वाचा: President Election 2022: भाजप खासदारांना मोदींकडून मिळणार ‘टिप्स'

या अपघातात तेजस तायडे हा जागीच ठार झाला तर इतर प्रवासी देखील जखमी झाले. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. किनगाव येथे त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजस तायडेच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: आमच्या भगिनीला शिंदे सरकारकडून न्याय मिळेल का ! मराठा समाजाची मागणी

Web Title: Young Man Returning From Pandharpur Wari Died In An Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..