Jalgaon Accident News : लोहारा येथील युवकाचा अपघातात मृत्यू; गावावर शोककळा

येथून जवळच असलेल्या कळमसरा- शेंदुर्णी रस्त्यावर मंगळवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Gunwant Kshirsagar
Gunwant Kshirsagaresakal

Jalgaon Accident News : येथून जवळच असलेल्या कळमसरा- शेंदुर्णी रस्त्यावर मंगळवारी (ता. २) सकाळी दहाच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

जंगीपुरा येथून दुधाच्या टँकर कळमसरा मार्गे पाचोरा येथे जात असताना मालवाहू गाडीने (क्रमांक एमएच १९, सीआय ५७३१) लोहाराकडून येणाऱ्या बजाज प्लेटिना दुचाकीला (क्रमांक एमएच १९, डीएन १७६२) जोरदार धडक दिली.(Youth from Lohara dies in an accident jalgaon news)

यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गुणवंत क्षीरसागर (वय ४४, रा. लोहारा, ता. पाचोरा) यांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही बातमी लोहारा परिसरात कळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या अपघातास जबाबदार असलेल्या वाहनचालकास आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी नागरिकांनी केली.

परंतु पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, लोहारा पोलिस पाटील सुरेंद्र शेळके यांनी नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळी पंचनामा करून वाहनचालक भूषण राजू चौधरी (वय २०, रा. पाचोरा) यास अटक केली.

Gunwant Kshirsagar
Jalgaon Accident News: गॅस टँकरच्या धडकेत कीर्तनकाराचा मृत्यू

त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाचोरा येथे पाठविण्यात आला. या घटनेचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार व अरविंद मोरे तपास करीत आहेत.

गुणवंत क्षीरसागर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे लिपिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. शांत व मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचा मृत्यू झाल्याने लोहारा येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली.

Gunwant Kshirsagar
Jalgaon Accident News: कारची दुचाकीला धडक; मामा- भाचा जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com