Jalgaon News : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

वरणगाव (जि. जळगाव) : भुसावळ तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर कपिल वास्तू नगरजवळ भुसावळहून वरणगावकडे मोटरसायकलने येणाऱ्या युवकासला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास घडली. (Youth killed in collision with unknown vehicle Jalgaon News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

याबाबत वरणगाव पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद भागवत राणे (वय४०, रा. होळी मैदान, तळवेल, ता. भुसावळ) हा युवक भुसावळ येथून दुपारी दीडच्या सुमारास मोटारसायकलने (क्रमांक- एम. एच. १९. एल ७१७१) ने घराकडे जात असताना कपिल वास्तू नगराजवळ कोणत्या तरी अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मिलिंद राणे यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

ज्यात मिलिंद यांचा महामार्गावरील दुभाजकाजवळ मृत्यू झाला, अशी फिर्याद मयताचे काका विलास जनार्दन राणे यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात दिल्यारुन अज्ञात वाहनाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक परशुराम दळवी, कर्मचारी मुकेश जाधव करीत आहे.

मयत मिलिंद राणे हे भुसावळ नगरपरिषदेत पाणीपुरवठा विभागात कॉन्ट्रॅक्टवर कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.