esakal | IDBI बँकेत 920 पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_IDBI_Bank

IDBI बँकेत 920 पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

IDBI Bank recruitment 2021 : IDBI बँकेने विविध करार (contract-based) आधारित एक्झीक्युटीव्ह पदांसाठी (contract-based) ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. आयडीबीआयने एक्झीक्युटीव्ह भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 4 ऑगस्ट रोजी सुरू झाले आहेत आणि हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑगस्ट 2021 आहे. उमेद्वारांना अर्ज एडीट करण्याची आणि ऑनलाइन फी भरण्याची वेळ 18 ऑगस्टला संपेल. उमेद्वारांना त्या कालावधी संपण्याआधी अर्ज करावे लागतील. इच्छुक उमेदवार idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

बँकेने एक वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स (पीजीडीबीएफ) साठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली आहे ज्यात कॅम्पसमध्ये नऊ महिन्यांचा वर्ग अभ्यास आणि आयडीबीआय बँकेच्या शाखांमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे.

या पदावरीन नोकरीसाठी किमान पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किमान 55 टक्के गुणांसह आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडीसाठी 50 टक्के आणि अर्ज करण्यासाठी किमान वय 20 वर्ष आणि कमाल 25 वर्ष असणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेत दिल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेची तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे.

हेही वाचा: Telegram चे खास फीचर्स जे WhatsApp वर देखील नाहीत, जाणून घ्या सविस्तर

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाईट idbibank.in ला भेट द्या

  • 'Career' लिंक वर क्लिक करा

  • 'Current Opening' लिंक वर क्लिक करा

  • ‘Recruitment Notification for Executive on Contract – 2021-22’ वर क्लिक करा

  • तुमच्या माहितीचा तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • फी भरा आणि नंतर पुढील वापरासाठी तुमच्या अर्जाची प्रत सेव्ह करा

ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना ‘how to apply’ सेक्शन आणि ‘frequently asked questions’ हे सेक्शन वाचण्याचा सल्ला दिला जातो. पात्रतेसाठी सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि अपात्र असल्याचे आढळल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

बँकेने जारी केलेल्या पदांची संख्या तात्पुरती आहे आणि आवश्यकतांनुसार बदलू शकते. करार 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल आणि उमेदवाराच्या कामगिरी आणि रिक्त पदांवर अवलंबून आणखी 2 वर्षांच्या वाढीसाठी विचार केला जाऊ शकतो.

कराराची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर, आयडीबीआय बँकेने घेतलेल्या निवड प्रक्रियेद्वारे नियुक्त अधिकारी आयडीबीआय बँकेत सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) साठी पात्र होऊ शकतात. तपशीलवार अधिसूचना वाचण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात आणि करिअर सेक्शनमध्ये अपलोड केलेली तपशीलवार जाहिरात वाचू शकतात.

हेही वाचा: मुक्‍त विद्यापीठाच्‍या ऑनलाईन परीक्षेला राज्‍यभरात सुरवात

loading image
go to top