
Jobs: भारताबाहेर नोकरीच्या शोधात आहात? कुवैतमध्ये सुरु होतेय भरती
कुवैत : कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांचे उद्योग आणि नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येकजण नोकऱ्याच्या शोधात आहे. तुम्ही जर भारताबाहेर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला कुवैतमधील संधी खुणावत आहेत. कुवैत सरकार देशाबाहेरील कामगारांसाठी भरती सुरु करणार आहे. अल अंबा या वृत्तपत्राचा संदर्भ देत गल्फ न्यूजने सांगितलं की, कुवैत संसदेकडे आरोग्याच्या काही अटीवर या भरतीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव आला आहे. त्यानुसार कामगारांच्या व्हिजासाठीसुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचं यामध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा: Radio Aksh: दृष्टीहीनांसाठी देशातील पहिले रेडिओ केंद्र नागपुरात सुरु
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भारतीयांना कुवैतमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रिपोर्टनुसार कुवैतमधील कुटुंबांना घरी काम करणाऱ्या कामगारांची जास्त गरज असून ज्या घरी वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले असतात त्या कुटुंबांना अशा लोकांच्या देखभालीसाठी कामगारांची गरज असते. कुवैतमधील मंत्र्यांनी सांगितलं की, सरकारने बाहेरील कामगारांना प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. आणि त्यांच्या व्हिजासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे.
हेही वाचा: PM असताना भेट मिळालेल्या वस्तू Imran Khan यांनी दुबईत विकल्या? मोठा खुलासा
कोरोनामुळे कुवैतमधील विदेशी कामगारांना फटका बसला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १ लाख ६८ हजार कामगारांना कुवैत सोडावं लागलं होत. त्यामध्ये सर्वांत जास्त भारतीयांचा सामावेश होता. त्यानंतर तेथील कामगारांची संख्या ९ टक्क्यांनी कमी झाली होती. या प्रस्तावानंतर भरतीसंबंधी कोणतीही तारीख स्पष्ट केली नसल्याचं मंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कुवैतमधील असलेल्या परदेशी नागरिकांच्या लोकसंख्येत भारतीयांचा आकडा जास्त आहे.
Web Title: Job Opportunity In Kuwait Offer For Indians
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..