Office Tips: नव्या ऑफिसमध्ये ऍडजस्ट करणं अवघड वाटतंय? वाचा या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Office Tips : नव्या ऑफिसमध्ये ऍडजस्ट करणं अवघड वाटतंय? वाचा या टिप्स

Office Tips : नव्या ऑफिसमध्ये ऍडजस्ट करणं अवघड वाटतंय? वाचा या टिप्स

पूणे : कोणत्याही नविन ठिकाणी गेल्यावर गोंधळून जायला होते. नवे ऑफिस जॉईन केल्यावर तिथले वातावरण, प्रेशर याचे टेन्शन येते. त्यामुळे कामात परफेक्ट असूनही आपण चुका करून बसतो. आणि आपले बॅड इम्प्रेशन पडते. नविन बॉस, कलीग यांच्याशी जुळवून घेताना आपल्यावर प्रेशर येते. अशावेळी काय करायचे हे सुचत नाही. तुम्हीही आताच नवीन ऑफिस जॉईन केले असेल. तर या पाच टिप्स तूम्हाला मदत करतील. या टिप्स फॉलो करून तुम्ही नवीन ऑफिसमध्ये सहज जुळवून घ्याल.

हेही वाचा: Office: ऑफिसमध्ये मनाविरुद्ध काम करण्याचे फायदे!

सहकाऱ्यांसोबत बोला

एखाद्या कामात अडचण येत असेल काही समजत नसेल तर बिनधास्त कलीग, नवे बॉस यांच्याशी बोला. यामुळे तूमचे टेन्शन थोडे हलके होईल. कंपनी आपलीशी करायची असेल तर तिथल्या लोकांकडून त्याबद्दल जाणून घेतले पाहीजे. गृपसोबत एकत्र जेवण, ट्रिपमध्ये, कंपनीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे.

हेही वाचा: Box office वर रश्मिका-अमिताभचा 'गूडबाय' पहिल्याच दिवशी गारद, कमाईचा आकडा लाजवणारा...

जुन्या ऑफिसशी तुलना नको

तुमच्या जुन्या ऑफिसचे नियम आणि वातावरण जरी मिस करत असाल तरी त्याची तूलना नव्या ऑफिससोबत करू नका. यामुळे नविन ऑफिसच्या अनेक गोष्टी दुर्लक्षित होतात. त्यामुळे ऑफिसचे वातावरण अनोळखी वाटू लागते.

हेही वाचा: Box Office: 'पोन्नियिन सेल्वन'ची करोडोंच्या फरकानं विक्रम वेधावर मात; कोणाची कमाई किती? वाचा

पॉझिटीव्ह राहा

नव्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर हे लक्षात ठेवा की, तुम्हाला जून्या ऑफिसमधील बॉन्डींग लगेचच परत मिळणार नाही. ज्याप्रमाणे आयुष्यात पॉझिटीव्ह घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसेच, ऑफिसमध्ये मिसळण्यासाठी, नवी नाती जोडण्यासाठी वेळ द्यायला हवा. लोकांशी बोलताना हसतमुखाने बोला. तूमच्या टेबलची सजावट हटके करा. त्यामुळे कलीग तूमच्या डेस्कजवळ आले की, त्यांना पॉझिटीव्ह वाटेल.

हेही वाचा: Women Harassment : तोतया Anticorruption Officer अन्‌ बोगस पत्रकाराचे प्रताप

तुमच्या मनाचे ऐका

नवीन ऑफिसमध्ये बर्‍याच वेळा तुम्हाला तुमचे कलीग, एचआर आणि कंपनीबद्दल काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतील. अशा वेळी इतर कलीग्सचे ऐकूण कुणाबद्दल वाईट मत बनवू नका. नेहमी शांत डोक्याने आणि पॉझिटीव्ह मनाने विचार करा.