आईच्या स्मरणार्थ पाच शाळांना एलईडी प्रोजेक्टर भेट

रवींद्र साळवी
शुक्रवार, 23 मार्च 2018

लांजा - आईच्या स्मरणार्थ परिसरातील पाच शाळा व महाविद्यालयांना एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट देऊन रिंगणे गावातील लाड कुटुंबिय व त्यांच्या मुलानी एक अनोखा पायंडा घालुन दिला आहे. स्वत अशिक्षित असलेल्या आईने खस्ता खाऊन अट्टाहासाने आपल्या मुलांना शिक्षण दिले होते.

शिक्षणा प्रती आपल्या आईने दाखविलेली प्रगल्भता पाहुन आईच्या स्मरणार्थ होतकरू विद्यार्थ्याना शिक्षण घेताना हातभार लावावा यासाठी हे प्रोजेक्टर भेट देण्यात आले आहेत.

रिंगणे गावातील रुक्मिणी महादेव लाड यांचे अर्धांगवायुच्या झटक्याने १० मार्च रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या मृत्युने लाड कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुखातुन सावरुन आपल्या आईची आठवण कायम रहावी व समाजात एक अनोखा पायंडा घालुन देण्याच्या उद्देशाने रुक्मिणीबाई लाड यांच्या बाराव्या विधीचे औचित्य साधून लाड कुटुंबिय व रुक्मिणी बाईंच्या मुलांच्यावतीने  रिंगणे परिसरातील सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे, रामेश्वर विद्यालय कोंडगे, प्राथमिक शाळा रिंगणे नं १,रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ व आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली-खोरनिनको या पाच शाळा व महाविद्यालयांना एल. ई. डी प्रोजेक्टर भेट देण्यात आले.

रुक्मिणीबाई लाड या स्वत अशिक्षित होत्या. मात्र तरी त्या शिक्षणाचे महत्व जाणुन होत्या. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेक खस्ता खाऊन ही आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्या शिक्षणासाठी नेहमीच आग्रही असत.
 
Web Title: Ratnagiri News LED Projecter present to 5 schools