मांडकी ग्रामस्थांचा वणवामुक्तीसाठी पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सावर्डे - मांडकी खुर्द ग्रामस्थांनी वणवामुक्त गावासाठी पुढाकार घेत असुर्डे, मांडकी बु, पालवण गावच्या सीमाभागात गावाभोवती दहा फूट भागाचा पट्टा जाळण्यात आला. यामुळे मांडकी खुर्द गावात अनवधानाने लागलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होणार नाही, तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या वणव्यामुळे मांडकी गावाच्या वनराई तसेच शिवाराला आग लागणार नाही. 

नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास केवळ मानवीकृत वणव्यामुळेच लागतो. अनेक झाडांची राखरांगोळी होते. वणवामुक्त गाव ही संकल्पना कोकणाची वनसंपदा व सौंदर्य टिकून राहील, असे प्रतिपादन सदाशिव बापट यांनी मांडकी खुर्द (ता. चिपळूण) गावच्या वणवामुक्त अभियान प्रसंगी केले.

कोकणचे वैभव आणि सौंदर्य म्हणजे कोकणाची वनसंपदा आहे. मात्र, मानवाच्या बेपर्वाईने ती ऱ्हास पावत आहे. कोकणच्या सह्याद्रीच्या रांगा होरपळून निघत आहेत. वणवे हे मानवी दुष्कृत्यामुळेच लागतात. काहीवेळा विघ्नसंतोषी लोक हे करतात. वणवामुक्त गावांना पुरस्काराने गौरविले जावे.
- डॉ. तानाजीराव चोरगे,

अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक

अभियानांतर्गत सरपंच संतोष गुढेकर, प्रगतिशील शेतकरी आणि गावकर शंकर डिके, श्रीराम घाणेकर, संजय धुमक, कृष्णा डिके, तानाजी धुमक यांनी गावच्या सीमा हद्दीत पट्टा जाळून गावच्या सभोवती गोल रिंगण मारले. यापूर्वी ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावच्या जुन्या तळ्यातील गाळ उपसून पाणी साठवले. याचा फायदा काही शेतकऱ्यांना झाला. प्रायोगिक तत्त्वावर मांडकी खुर्द गावात केले जाणारे उपक्रम नेहमीच गावच्या विकासाला पूरक असल्याचे मत सरपंच संतोष गुढेकर यांनी मांडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News forest fire