फोटो व्हिडिओ संघटनने जपली सामाजिक बांधिलकी

मकरंद पटवर्धन
रविवार, 19 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली. पावस येथे 1995 मध्ये स्थापन झालेल्या अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमासाठी संघटनेने इलेक्ट्रिक कुकर भेट म्हणून दिला.

रत्नागिरी - जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली. पावस येथे 1995 मध्ये स्थापन झालेल्या अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमासाठी संघटनेने इलेक्ट्रिक कुकर भेट म्हणून दिला. यामुळे सर्व महिलांच्या चेहेर्‍यावर हास्य उमटले. तसेच दोन दिवस गणेशगुळे व रत्नागिरीमध्ये प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोग्राफी व फोटो एडिटिंग वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद मिळाला.

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्री वेडिंग व पोस्ट वेडिंग फोटोग्राफी व त्या फोटोंचे एडिटिंग करण्याची कार्यशाळा आयोजित केल्याने येथील छायाचित्रकारांना भरपूर उपयोग झाला. दरवर्षी संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढेही अशाच प्रकारच्या कार्यशाळांमधून छायाचित्रकारांची प्रगती करू, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी केले.

या संघटनेमध्ये जिल्ह्यातील बहुतांशी फोटोग्राफर्सनी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही संघटना अधिक बळकट होत असल्याचेही बाष्टे यांनी सांगितले. गणेशगुळे येथील समुद्रकिनारी प्री वेडिंग फोटोग्राफी वर्कशॉप झाले. त्याला छायाचित्रकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आज माळनाका येथे वैभव रासकर यांनी फोटो एडिटिंग कार्यशाळा घेतली. या कार्यक्रमात छायाचित्रकार सचिव सुबोध भोवड, उपाध्यक्ष साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग घेतला. सुभाष फोटोरत्न आणि स्मार्ट लॅबने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social responsibility of the photo video organization