मदतीचा ज्ञानयज्ञ अतिशय मोलाचा : डॉ. आनंद ओक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सातारा : गेली 48 वर्षे सातारा शहरात सुरू असलेला हा मदतीचा ज्ञानयज्ञ अतिशय मोलाचा आहे. रा. ना. गोडबोले ट्रस्ट व त्यातून मिळणारी मदत तुमच्या ध्येयाला साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मीही या ट्रस्टद्वारे 80 च्या दशकात पाचवी ते दहावीपर्यंत मदत घेतली आहे. ते दिवस आम्ही विसरणार नाही. एकाग्रता, चिकाटी ठेवाल तर यश तुमचेच आहे, असा विश्‍वास आयुर्वदाचार्य डॉ. आनंद ओक यांनी व्यक्‍त केला. 

येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे सातारा शहरातील इयत्ता पाचवी ते नववीच्या 142 मुले व मुलींना शैक्षणिक मदतीचे वाटप येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले. प्रत्येकी 700 ते 900 रुपये अशी एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांची आर्थिक ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. सातारा पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती, कौशिक प्रकाशनचे संस्कारधारा हे पुस्तक प्रदान करण्यात आले. 
माजी नगराध्यक्ष, ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. श्री. शिंदे यांनी गोडबोले कुटुंबीयांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. प्रकाश गवळी यांनी मनोगत व्यक्‍त केले. आर्यन गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रद्युम्न गोडबोले यांनी आभार मानले. या वेळी ट्रस्टचे विश्‍वस्त उदयन गोडबोले, आयडीबीआय ट्रस्टी कंपनीच्या मानसी माचवे, मानसी पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help nature is very valuable : Dr. Anand Oak