गडचिरोलीच्या पोलिसाने गाठला जगातील सर्वांत उंच रस्ता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

गडचिरोली - एकीकडे नक्षलवाद्यांशी तळहातावर प्राण घेऊन लढणारे गडचिरोलीचे पोलिस जवान मनात आणल्यास हिमालयालाही टक्‍कर देऊ शकतात, याचा प्रत्यय गडचिरोली पोलिस दलातील सी-६० पथकाच्या किशोर गोपालदास खोब्रागडे या जिगरबाज पोलिस जवानाने आणून दिला. किशोर खोब्रागडे यांनी जगातील सर्वांत उंच व अवघड रस्त्यावरून मोटारसायकल चालविण्याचा पराक्रम केला. ही उंची थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १८ हजार ३८० फूट आहे.

किशोर खोब्रागडे यांनी आपल्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकलवर जगातील सर्वांत उंचीवर असलेला खारडोंगला रस्ता (१८ हजार ३८० फूट), तागलंगला रस्ता ( १७ हजार ५८२ फूट), चांगला रस्ता (१७ हजार ५६६ फूट) ही ठिकाणे अवघ्या तेरा दिवसांत पार केली. या दरम्यान त्यांनी २ हजार ४०० किमीचा प्रवास पूर्ण करून देशाच्या इतिहासात गडचिरोली पोलिसांचे नाव झळकविले.

२००७ मध्ये गडचिरोली पोलिस दलात दाखल झालेल्या किशोर खोब्रागडे यांनी सी-६० दलात सहभागी आहेत. त्यांनी अनेक नक्षलविरोधी अभियानात विविध चकमकींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामुळेच त्यांचा नक्षल्यांमध्ये दरारा आहे. २०१३ मध्ये उत्तर भारतात फिरत असताना जगातील सर्वांत उंच रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करण्याचे त्यांनी ठरविले. हिमवादळ, रक्‍त गोठवणारी थंडी, बर्फाच्छादित रस्ते, उणे १५ अंश सेल्सिअस तापमान, रस्त्याच्या बाजूला असलेली जीवघेणी दरी अशा सर्व संकटांवर मात करत त्यांनी संकल्प सिद्धीस नेला. खोब्रागडे यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadchiroli news police