रुग्णवाहिका येताच होईल रस्ता "क्‍लिअर'

अनिल कांबळे
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - अनेकदा रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून नागपूरच्या दोन युवकांनी वाहतूक सिग्नल नियंत्रण प्रणाली तयार केली आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी चौकातील रेड सिग्नल आपोआप ग्रीन होऊन वाट मिळणार आहे. कौस्तुभ कुलकर्णी व नाहुश कुलकर्णी अशी शोधकर्त्या युवकांची नावे आहेत.

नागपूर - अनेकदा रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून नागपूरच्या दोन युवकांनी वाहतूक सिग्नल नियंत्रण प्रणाली तयार केली आहे. रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी चौकातील रेड सिग्नल आपोआप ग्रीन होऊन वाट मिळणार आहे. कौस्तुभ कुलकर्णी व नाहुश कुलकर्णी अशी शोधकर्त्या युवकांची नावे आहेत.

कौस्तुभ व नाहुश यांना कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काम करण्याची आवड आहे. त्यांनी वेगवेगळे कोर्सेस केले आहेत. तीन वर्षांपासून ते ‘स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाइट कंट्रोलर सिस्टिम फॉर इमर्जन्सी व्हेइकल’ या प्रोजेक्‍टवर काम करीत होते. हा प्रोजेक्‍ट फ्रिक्‍वेन्सीच्या आधारे कार्य करणार आहे. चौकात लागलेल्या सिग्नलवर फ्रिक्‍वेन्सीच्या मदतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेमध्ये डिव्हाइस लावण्यात येणार आहे. त्याचे मॉनिटरिंग सिस्टिम सिग्नलच्या खांबावर असलेल्या कंट्रोल बॉक्‍समधून करण्यात येणार आहे.

 रुग्णवाहिका चौकात येताच तिन्हीही बाजूंचे सिग्नल्स रेड होतील आणि रुग्णवाहिका जात असलेल्या मार्गावर आपोआप ग्रीन सिग्नल सुरू होईल. त्यामुळे रुग्णवाहिकला रस्ता मिळून चौकातून भरधाव निघून जाईल. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच ट्रॅफिक सिग्नल सुरू राहतील. यासाठी दीड लाखांचा खर्च असून, तीन सेट्‌समध्ये हा प्रोजेक्‍स बसवावा लागणार आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता बालभारतीसमोरील चौकात पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘लाइव्ह डेमो’ करून दाखवला.  

प्रयोगातून प्रोजेक्‍ट
कौस्तुभचे वडील बॅंकेत, तर नाहुशचे वडील पुजारी आहेत. प्रोजेक्‍टसाठी लागणारा खर्च आईवडिलांनी केला आहे. जिद्दीने प्रोजेक्‍टवर तीन काम केल्यानंतर यश आले आहे. हा प्रोजेक्‍ट राज्यच नव्हे, तर देशात वापरल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतील.

अशी आहे तंत्रप्रणाली
रुग्णवाहिकेत इकोमीटर नावाचे डिव्हाइस (चिप) बसविण्यात येईल. तसेच दुसरे डिटेक्‍टर नावाचे डिव्हाइस सिग्नल्सच्या खांबावर बसविण्यात येईल. खांबावरील डीपीमध्ये कंट्रोल युनिट असेल. वाहनाचे अंतर त्यावरून सेट केले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road clearer after ambulance arrives