दाढीचे पैसे बचत करून कॅन्सरग्रस्तांना दिले १० हजार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वारणानगर - येथील कॅन्सर फाउंडेशनतर्फे ‘नो शेव्ह नोव्हेंंबर’ हे अभियान महिनाभर राबवून यातून दाढीचे बचत केलेले पैसे ‘एक हात कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी’ या उपक्रमाद्वारे जमा केले. यातून रंगराव बापू सांगले (शहापूर), संतोष पांढरे (कोडोली, ता. पन्हाळा) या कॅन्सरग्रस्त दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली.

येथील हॉटेल त्रिवेणीच्या सभागृहात कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, केखले प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, उद्योजक विशाल जाधव याच्या हस्ते कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत दिली.

कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या मदतीतून रुग्णांना आधार निर्माण झाला असून या उपक्रमास भविष्यात चांगला प्रतिसाद मिळून अनेक रुग्णांना मदत होणार असल्याचे श्री. झाडे, श्री. पाटील, श्री. जाधव यांनी सांगितले. या वेळी प्राजक्ता चव्हाण, प्रफुल्ल कावळे, अक्षय डोंबे, अनिल बुवा, धनराज पाटील, धीरज पाटील, विनोद महापूरे, राहुल पाटील, ओमकार जाधव आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 thousand rupees for cancer victims