प्राथमिक शिक्षकांचे दातृत्व, आरोग्य केंद्रांना 'श्वास' देऊन सिध्द केले कर्तृत्व

हेमंत पवार
Friday, 13 November 2020

कऱ्हाड तालुक्‍यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यावर पंचायत समितीने "चला माणूस वाचवू' या उपक्रमांतर्गत तालुक्‍यातील रेशनकार्ड नसणाऱ्या एक हजार 224 कुटुंबांना धान्याची किट, पार्ले येथील कोविड सेंटरला 20 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर दिले.

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यासाठी तालुक्‍यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना 43 लिटरचे प्रत्येकी दोन जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर प्रदान करण्यात आले. 

तालुक्‍यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यावर पंचायत समितीने "चला माणूस वाचवू' या उपक्रमांतर्गत तालुक्‍यातील रेशनकार्ड नसणाऱ्या एक हजार 224 कुटुंबांना धान्याची किट, पार्ले येथील कोविड सेंटरला 20 जम्बो ऑक्‍सिजन सिलिंडर दिले. त्यानंतर सध्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रानाही ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी दोन या प्रमाणे 22 सिलिंडर वाटप करण्यात आले. 

कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पाच वर्षांच्या बालिकेची झाली आई- बाबांची भेट

पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, माजी उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, विस्तार अधिकारी नितीन जगताप, जमिला मुलाणी, पोषण आहार अधीक्षक विजय परीट, जिल्हा मेडिकल असोसिअशनचे अध्यक्ष सागर पाटील, शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप रवलेकर, ज्ञानबा ढापरे, समितीचे अध्यक्ष अरुण पाटील, बहुजन परिवाराचे प्रवीण लादे, दोंदे संघाचे अध्यक्ष गणेश जाधव, पदवीधर संघाचे अध्यक्ष बी. टी. पाटील, शिक्षक भारतीचे जहांगीर पटेल, केंद्रप्रमुख संघटनेचे हनमंत काटे आदींच्या उपस्थितीत ही सिलिंडर देण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 Oxygen Cylinders Donated To 11 Primary Health Centers In Karad Satara News