सासरा, जावयाने फुलविले शिवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर पायथा.

टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर पायथा.

डाहुलीतील गबाजी पिंगळे सासरे आणि बेंदेवाडीतील गणपत डेनकर जावई. त्यांनी शिवारात पाणी आणून समूह शेतीला सुरवात केली. ६५ एकर शेतीत त्यांनी केली आहे. त्यांचे शेत गहू, बटाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर, मेथी, मुळा, वांगी, काळाघेवडा, पावटा, राजमा पिकांनी बहरले आहे. हमालीमध्ये फार मिळेनासे झाल्याने पुढे काय हा प्रश्‍न होता. १९९९ मध्ये पहिली, २००२ मध्ये दुसरी विहीर खोदली, पण पाणी लागले नाही. दोन वर्षांपूर्वी हातपंपासाठी बोअरवेल लावला पण निराशाच पदरी आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, खांडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे शेती कर्ज, पीककर्ज, मध्य मुदत कर्ज काढले आणि खडकाळ जमिनीवर खाचरे पाडली. ठोकळवाडी धरणातून पाणी उचलण्यासाठी मोटार बसविली. दोघांची ६५ एकर जमीन ओलिताखाली आली. सोमनाथ पिंगळे, दिलीप पिंगळे यांना सोबत घेऊन ते आता समूह शेती करत आहेत. हिराबाई पिंगळे, मीरा पिंगळे, सहिंद्रा पिंगळे, संगीता पिंगळे, आशा डेनकर याही शेतात राबतात. 

स्वप्न सत्यात उतरले
सासरे, जावई २५ वर्षे मुंबई-दादर, ठाणे फलाटावर हमाली करत होते. फलाटातून डोक्‍या-खांद्यावर घेतलेले ओझे वाहताना शिवारातील पडीक जमीन डोळ्यापुढे तरळायची. या खडकाळ जमिनीवर हिरवे शिवार फुलवायचे असे स्वप्न त्यांनी पाहिले, ते त्यांनी पूर्णत्वाला नेले. 

परिसरात पिंगळे, डेनकर यांच्यासारखे अपवादात्मक शेतकरी ज्यांनी खडकाळ माळरानावर हिरवी शेती फुलवली. येथे त्यांना शेतीपूरक व्यवसायांसह कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Motivation