उत्तम नोकरीपेक्षाही युवक घडवतोय शेतीत ‘करिअर’

उत्तम नोकरीपेक्षाही युवक घडवतोय शेतीत ‘करिअर’

वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात  
 येणाऱ्या शिरपूर जैन गावातील गणेश इरतकर हे बीएस्सी ॲग्री आहेत. त्या जोडीला त्यांनी ‘एमबीए’ची पदवीही घेतली आहे. करिअरची सुरवात त्यांनी नोकरीतून केली. आघाडीच्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून त्यांनी अनुभव घेतला. नोकरीत चांगली बढती मिळाली असली तरी मूळ आवड शेतीतीच होती. त्यातच काहीतरी भरीव कामगिरी करायची इच्छा होती. सात वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर सन २०१४ मध्ये राजीनामा दिला. 

 घरच्या शेतीतील करिअर
नोकरीत असताना प्रयोगशील शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क येत होता. आपली शेतीही त्याच पद्धतीची करायची असा निश्चय त्यांनी केला. इरतकर कुटुंबाकडे अाठ एकर शेती हंगामी व कोरडवाहू स्वरूपाची होती. त्यात पारंपरिक पिके घेतली जायची. त्यातून जेमतेम उत्पादन मिळायचे. गणेश यांनी शेतीत सुधारणा घडवायला सुरवात केली. 

 पहिल्याच पिकाने दिला अात्मविश्वास 
शिरपूर जैनमध्ये पाण्याची टंचाई भासते. इरतकर यांनी २०१३ मध्ये विहीर खोदली; मात्र पुरेसे पाणी लागले नाही. काळा दगड लागला. त्यामुळे दुसऱ्या जागी बोअर घेतले. त्याला थोडे पाणी लागले. त्या आधारे कलिंगड घेतले. रमजान महिन्याच्या काळात ते विकता येईल अशा पद्धतीचे लागवड व्यवस्थापन केले. पहिल्याच प्रयोगात एकरी ३३ टन एवढे भरघोस उत्पादन घेण्यात गणेश यशस्वी झाले. दरही किलोला १० ते १५ रुपयांपर्यंत मिळाला. येथून प्रयोगशीलतेला अधिक गती मिळाली. 

 पाणी मिळेना; पण हार मानली नाही 
इरतकर यांच्या शेतीतील सिंचन मार्गात पाण्याचा मोठा अडसर कायमच राहिला; पण गणेश यांनी हार मानली नाही. पाण्यासाठी गेल्या तीन वर्षांत सहा बोअर घेतले. एक बोअर तर शेतापासून अडीच किलोमीटर अंतरावर असून, तेथून पाइपलाइन टाकून त्याचे पाणी शेतातील विहिरीत आणले. इतर बोअरचे पाणी एकत्रित करून बागायती शेती सुरू केली.   

  शेतीत घडवलेले बदल
 गणेश यांना नोकरीपेक्षा स्वतःची शेती घडवण्यात व मालक म्हणून राहण्यात अधिक रस होता.  त्या दृष्टीने शेती पद्धतीची आखणी केली. 
 सन २०१३ पासून पारंपरिक पिकांपासून फारकत घेतली.
 बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यातूनच मिरची, हळद, अाले, कांदा अशी पिके घ्यायला सुरवात केली. - द्राक्षासारखे या भागात तसे नवे असलेले पीक घेतले.
 आज शेतीत झोकून देत काम करणाऱ्या इरतकर कुटुंबाकडे दररोज दहा मजूर कामाला असतात. -गणेश यांनी आपले बंधू रमेश यांच्या साह्याने ‘ॲग्रो क्लिनिक’ सुरू केले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना योग्य सल्ला देत पीक व्यवस्थापनाबाबत ते मार्गदर्शन करतात. यासाठी कोणते शुल्क घेतले जात नसल्याचे गणेश म्हणाले.
 आपल्या शिक्षणाच्या व नोकरीच्या काळात विविध ठिकाणी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या घेतलेल्या भेटींचा फायदा स्वतःच्या शेतीसाठी करून घेतला. 

 मिरची झाले मुख्य पीक 
 मिरची हे गणेश यांचे मुख्य पीक झाले आहे. गेल्या वर्षीपर्यंत थोड्या क्षेत्रापर्यंतच लागवड असायची. या वर्षी एक एकरात जून महिन्यात मल्चिंगवर मिरची घेतली. अातापर्यंत त्यातून १७० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. अजून १०० क्विंटलपेक्षा अधिक माल मिळेल, अशी गणेश यांना अपेक्षा आहे. आजवर सरासरी २७ ते ३० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सर्व मिरची वाशीम बाजारात विकली.

 झेंडू विकला हैदराबादला
सणासुदीच्या काळात चांगले दर मिळू शकतात, याचा अाढावा घेत या वर्षी अर्ध्या एकरात झेंडूची लागवड केली. त्यातून ५३ क्विंटल माल मिळाला. फुले हैदराबादला नेऊन विकली. दसऱ्याला ६० रुपये व दिवाळीला ८० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. शिवाय १५ क्विंटल फुले स्थानिक व्यापाऱ्याला जागेवरच ४० रुपये दराने विकली. झेंडूला सरासरी ५५ रुपये दर मिळाला.  

 : गणेश पांडुरंग इरतकर, ९८९०३७०१००

उच्चशिक्षण घेऊन केवळ नोकरी करणे हा उद्देश न ठेवता मिळवलेले ज्ञान व अनुभव यांचा वापर करून शेतीत उल्लेखनीय प्रगती साधता येते. वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील गणेश इरतकर या युवकाने तरुणाने ते सिद्ध केले आहे. मार्केटचा बारकाईने अभ्यास, त्या दृष्टीने पीकपद्धतीचा अंगीकार ही गुणवैशिष्ट्ये जपत शेतीचा कायापालट करण्याचा प्रयत्न गणेश यांनी केला आहे. 

 गणेश आपल्या यशाबाबत सांगताना म्हणतात, की पिकांचे किंवा शेतीत योग्य निदान किंवा ‘प्रॉपर डायग्नाॅस्टीक्स’ महत्त्वाचे असते. सर्व व्यावसायिक पिकांचे व्यवस्थापन करताना याच सूत्राचा फायदा होत अाहे. एकरात मिरचीचे अात्तापर्यंत पाच लाखांवर उत्पन्न झाले अाहे, त्यामागेही बाजारपेठेचा अभ्यास व हे सूत्र फायद्याचे ठरले. 

 मिरचीला ‘व्हायरस’, ‘थ्रीप्स’पासून वाचवण्याची योग्य काळजी घेतली. रोग, कीड अाल्यानंतर नियंत्रण व्यवस्थापन करण्यापेक्षा प्रतिबंधक उपायांवरच भर दिला. 

 हळदीचे उत्पादनही चांगले घेण्याचा प्रयत्न आहे. सेलम जातीसोबत या वर्षी चेन्ना सेलमची लागवड केली अाहे. या हळदीला अधिक फुटवे मिळत असल्याचे ते म्हणतात.

एकरी २८ क्विंटल (वाळलेली)
उत्पादन मिळतेय. यंदा ते ४० क्विंटलपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे. आल्याचे एकरी ११० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

 शेणखतासाठी तसेच जोडधंदा म्हणून गीर गायी व म्हशींचे पालन करतात. 

 पाण्याची शाश्वत सुविधा करण्यासाठी शेततळे खोदले आहे. 

 येत्या वर्षात पाॅलिहाउस उभारण्याचा विचार आहे.

 एखाद्या बाबीसाठी गुंतवणूक महत्त्वाची असल्यास ती करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत.   

 प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची वृत्ती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com