बागलाणची "मधमाशी' उडाली जागतिक पातळीवर

रणधीर भामरे - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

वीरगाव - सटाणा येथील रहिवासी असणारे व अभिनयानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारे प्रशांत महाजन यांच्या "मधमाशी‘ या लघुपटाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण किती अवघड असते व मुलीला शिकविण्यासाठी बापाची धडपड या विषयावर त्यांनी 30 मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली. बागलाण तालुक्‍यात चित्रीकरण झालेल्या या लघुपटाला थेट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये स्थान मिळाले आहे. जुलैमध्ये होणाऱ्या या महोत्सवात जगभरातून सुमारे 180 लघुपट दाखल झाले आहेत.

बागलाण तालुक्‍यासारख्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लघुपटाची निर्मिती करून महाजन यांनी आदर्श निर्माण केला आहे. निर्मितीसाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध नसतानाही त्यांनी लघुपटाची निर्मिती करण्याचे धाडस केले. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.

सुमन फिल्म्स प्रॉडक्‍शनच्या बॅनरखालील या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन श्री. महाजन यांनी केले आहे. कथा, पटकथा व संवाद एजाज खान यांचे व कॅमेरा संपादन प्रल्हाद रौंदळ यांचे आहे. लघुपटात प्रामुख्याने प्रशांत महाजन, दीपमाला जाधव, बालकलाकार वैभवी मोरे, चाणक्‍य पाटील, राजू मोरे, योगेश निकम, भटू चौधरी, बालकलाकार साऊ देवरे, कार्तिक देवरे, डॉ. दौलत गांगुर्डे, परेश येवला यांनी भूमिका साकारल्या आहेत. तुषार येवला, जगदीश देवरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

श्री. महाजन यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटांत व मालिकांत अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्यांना प्रथम संधी "आई शक्ती देवता‘ चित्रपटातून मिळाली. त्यानंतर अनेक वर्षे अभिनयापासून लांब राहून पुन्हा खानदेशी भाषेतील "ओ तुनी माय‘ या चित्रपटातून यशस्वी पदार्पण केले. त्यानंतर "पाशबंध‘, "व्हाट अबाऊट सावरकर‘ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. याबरोबरच "श्रीदेवता तुझी कहाणी‘, "तू जिवाला गुंतवावे‘ व "लक्ष‘ या मालिकांतूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवून दिली.

Web Title: Baglan BEE Fly on global platform