वसगडे येथील गाव तलावाचे रुपडे पालटले

प्रकाश नलवडे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

सांगवडेवाडी - गावात तलाव असणे म्हणजे गावची शान समजली जाते. अशाच वसगडे (ता. करवीर) येथील गाव तलावाचे रूप पालटले ते विवेकानंद कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्यातून. येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग सुरू असून रोज सुमारे पाचशे पर्यटक भेट देतात. या तलावाजवळ छायाचित्र काढतात. सूर्य उगवताना व मावळताना तलावाचे दृश्‍य पाहण्यासारखे असते. 

शासनाच्या मुनिजन योजनेअंतर्गत गाव दत्तक योजना अनुसरून विवेकानंद कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतर्फे येथे काम चालू आहे. ७० मुली, ८० मुले तलाव सुशोभीकरण, स्मशानभूमी, गावात स्वच्छता, व्याख्याने, पथनाट्य घेऊन आदर्श गाव करण्यासाठी झटत आहेत. यामध्ये त्यांनी पाण्यावर असणारी केंदाळ वनस्पती काढली. झाडाझुडपात बुजलेली विहीर स्वच्छ केली.

या विहिरीवर जाळी टाकणे आवश्‍यक आहे. तलावाशेजारी बाजार कट्ट्यावर भरणारा बाजार संपल्यानंतर कचरा तलावात टाकण्यात येत होता. प्रा. संदीप पाटील यांनी त्याला पायबंद घातला. या तलावात निर्माल्य, गणेशमूर्ती विसर्जन केले जात नाही. सरपंचांसह सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित राहून तलाव स्वच्छतेसाठी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी तलावाभोवती असणाऱ्या संरक्षण भिंतीवर ‘लेक वाचवा, देश वाचवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असे अनेक संदेश लिहिले आहेत. 

सुमारे १०० झाडे तलावाभोवती लावली आहेत. पूर्वी तलाव व विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर होत होता. कालांतराने सांडपाणी मिसळत असल्याने पिण्यास पाणी वापरणे बंद झाले. तलावात मिसळणारे सांडपाणी ग्रामपंचायतीने सध्या बंद केले आहे. बागडी समाजही या तलावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. उपसरपंच संदीप कामत, सर्व पंच, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, अभयकुमार साळुंखे, शुभांगी गावडे, प्रा. एच. पी. पाटील, प्रा. बी. एस. लाड, प्रा. एस. डी. जोशी, प्रा. व्ही. सी. महाजन, एकनाथ मंगल, एस. पी. देसाई, राम बोंगे, दीडशे विद्यार्थी-विद्यार्थिनी गावाच्या सौंदर्यासाठी झटत आहेत. 

Web Title: beautification of lake in Vasgade

टॅग्स