रानमेवा विकून मुलांनी उचलला शिक्षणाचा भार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

डोंगरकिन्ही - पाटोदा तालुक्‍यातील डोंगरमाथ्यांनी वेढलेले डोंगरकिन्ही गाव. या गावासह परिसर रानमेवा व गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या परिसरात रानमेव्यांची लज्जत दूरदूरपर्यंत पोहोचली असून पुणे, मुंबई, गोवा, तसेच अन्य राज्यांतही या रानमेवा म्हणजे सीताफळाचा गोडव्याची मागणी वाढली आहे. दररोज सीताफळाची निर्यात होत आहे. यामुळे रोजगारासह उत्पन्न मिळत आहे. 

सध्या शाळेला सुट्या असल्याने शाळेत शिकणारी लहान मुले रस्त्याच्या कडेला सीताफळे विकताना ठिकठिकाणी दिसतात. दिवसाकाठी २०० ते ३०० रुपयांची विक्री होते. या पैशातून शैक्षणिक साहित्य, तसेच कपडे खरेदी केली जातात. रानमेवा विकून शिक्षणाला हातभार लावला जात आहे. पाटोदा तालुक्‍यासह परिसरातील नागरिक ऊसतोडणीसाठी बाहेर ठिकाणी मुलेबाळे सोडून ऊसतोडणी करण्यासाठी जातात. मुले आई-वडिलांना हातभार लागावा म्हणून सीताफळांची विक्री करून आपला शैक्षणिक खर्च भागवताना दिसतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed news children education