चर्चा तर होणारच! 'हा' चहावाला दिवसभर चहा विकून गोरगरीब, भिकाऱ्यांची भागवतोय भूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Chandravanshi

हा चहावाला स्वतः अपयशी जीवन जगत असतानाही त्याच्या कष्टाच्या पैशातून तो गरीबांना मदत करताना दिसतोय.

'हा' चहावाला दिवसभर चहा विकून गोरगरीब, भिकाऱ्यांची भागवतोय भूक

बिहार : गया (Bihar) येथील एका चहावाल्याच्या दातृत्वाची जोरदार चर्चा सुरुय. ही चर्चा कोणत्याही राजकीय कारणासाठी नाही. अगदी त्याच्या नृत्य, गायन, मिमिक्री किंवा इतर कोणत्याही प्रतिभेमुळं नाही, तर चहावाला त्याच्या दातृत्वामुळं चर्चेत आहे. हा चहावाला स्वतः अपयशी जीवन जगत असतानाही त्याच्या कष्टाच्या पैशातून तो गरीबांना मदत करताना दिसतोय. गया येथे चहा विकून उदरनिर्वाह करणारे संजय चंद्रवंशी (Sanjay Chandravanshi) गेल्या अनेक वर्षांपासून गरीब, भिकाऱ्यांची सेवा करत आहेत. अशा लोकांना ते ब्लँकेटचं वाटप करत असून गरीबांना खाऊ घालताहेत आणि थंडीपासून वाचवण्यासाठी शेकोटी पेटवण्याचं कामही ते करताहेत.

NI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, काही दिवसांपूर्वीच संजय यांनी आपल्या कमाईतून गरीबांसाठी दोनशे ब्लँकेट्स विकत घेतली आणि त्यांचं वाटपही केलंय. गरजूंची सेवा ही आता संजयची आवड बनलीय. संजय याविषयी सांगतो की, त्याचे वडील आणि आजोबाही याच पद्धतीनं सेवेच्या कामात गुंतले आहेत. गरीबांना निवारा बांधण्याची मागणी संजयनं सरकारकडं केलीय. निवारा बांधल्यानं गरीबांना त्यांचं काम करणं सोप जाईल, असं त्यांच म्हणणं आहे.

संजय चंद्रवंशी हे गया येथील गौतम बुद्ध मार्गावरील गोल पथर मोडजवळ हातगाडीवर चहा विकतात. हा चहाचा स्टॉल त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनाचा आधार आहे. संजय हातगाडीवर चहासोबत सत्तू आणि ज्यूसही विकतो. दिवसभर चहा, सत्तू आणि ज्यूस विकून जे काही उत्पन्न मिळते, त्याचा काही भाग संजय गरीबांना खायला घालतो. स्वतः अपयशी जीवन जगणाऱ्या संजयला देणगी देण्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. याबद्दल तो सांगतो, वडिलांसोबतच त्याचे आजोबा आणि पूर्वज नेहमीच लोकांना मदत करत आले आहेत. ज्याचं तो अनुकरण करत आहे. संजय गया जिल्ह्यातील इमामगंज ब्लॉकमधील केंदुआ गावचा रहिवासी आहे. संजय दिवसभर काबाडकष्ट दररोज 20 ते 25 लोकांना खाऊ घालतो. तो रोज सकाळी गाडीजवळ उपस्थित असलेल्या गरीबांना चहा आणि बिस्किटाचंही वाटप करतो.

टॅग्स :Bihar