धन्यवाद अशोक देशमाने

जाहिरात
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. अशोक देशमाने यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

पुणे: आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. अशोक देशमाने यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

नापिकी आणि कर्जापायी महाराष्ट्रातील कैक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. बाप नावाचा आधारवड हरपल्याने या शेतकऱ्यांच्या मुलांपुढे काळाकुट्ट अंधार उभा ठाकला. त्यांना या अंधारातून बाहेर काढून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करण्यासाठी समाजसेवारुपी तिफण हाती धरलंय ते तिशीतल्या एका उमद्या तरुणानं.

अशोक देशमाने असं या प्रकाश पेरत्याचं नाव. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील. मानवती तालुक्‍यातील मंगरूळ हे त्यांचं गाव. आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी; पण आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी या नोकरीवर पाणी सोडले. "या सुखांनो साद घालू दुःखीतांच्या जीवनी...' या काव्यपंक्तीनुसार देशमाने यांनी आपले कार्य सुरू केले. यासाठी आळंदीपासून नऊ किलोमीटरवर असलेल्या कोयाळी गावात त्यांनी स्नेहवन नावाने संस्था उभी केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबरच वंचित घटकातील 80 हून अधिक मुले सध्या या संस्थेत शिकत-घडत आहेत.शालेय शिक्षणाबरोबरच सेंद्रिय शेती, संगणकाचेही धडे त्यांना दिले जात आहेत. केवळ शिक्षण घेऊन नोकरी मिळेलच, असे नाही. यामुळे मुलांना आधुनिक शेतीचेही ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. या हेतूनेच देशमाने यांनी संस्थेत या मुलांसाठी सर्वांगी ज्ञानाची कवाडे खुली करून दिली आहेत. यामुळे या मुलांचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल, असा विश्‍वास देशमाने बोलून दाखवितात.

देशमाने यांना या कार्यात पत्नी अर्चना यांचीही खंबीर साथ आहे. या दांपत्यानं सर्वप्रथम मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटी दिल्या. त्यांना धीर दिला. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. अशा अनेक कुटुंबातील मुलांना घेऊन ते पुण्याला आले.

देशमाने यांच्या कामाने प्रभावित होऊन भोसरीतील डॉ. स्मिता कुलकर्णी आणि रवींद्र कुलकर्णी यांनी कोयाळीतील स्वतःची दोन एकर जागा "स्नेहवन'ला दान केली. या जागेत वाचनालय, गोशाळा, संगणक प्रयोगशाळा तसेच मुलांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. ऐंशीपैकी दहा मुले सध्या दहावी-बारावीचे शिक्षण घेत आहेत. या सर्व मुलांचे जेवण रोज देशमाने दांपत्य स्वतःच्या हाताने बनवितात.

या जागेत देशमाने यांनी शेतीही फुलविली आहे. त्यातून मुलांना सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिकासह माहिती मिळत आहे. सध्या भेंडी, पालक, गवार, चवळी यांसारखी पिके शेतीत डौलत आहेत. गोमूत्रापासून बायोगॅस प्रकल्पही राबविण्यात आला आहे. कंपोस्ट खत तयार करण्याची कलाही देशमाने दांपत्याने मुलांना शिकवली आहे. यातून मुलांना शेतीशी लळा जडलाय. आरोग्य चांगले राहावे, यासाठी रोज सकाळी मुलांना योगाचे धडे दिले जातात. आवडीप्रमाणे वारकरी सांप्रदायिक शिक्षणही त्यांना दिले जाते. या समाजकार्याबद्दल देशमाने यांना कॅडबरी डेअरी मिल्ककडून मनःपूर्वक धन्यवाद !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cadbury Dairy Milk thanks to Ashok Deshmane for his outstanding work