esakal | धन्यवाद दिनकर बंदुके
sakal

बोलून बातमी शोधा

Cadbury Dairy Milk thanks to Dinkar Banduke for his outstanding work

आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. दिनकर बंदुके यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

धन्यवाद दिनकर बंदुके

sakal_logo
By
जाहिरात

पुणे: आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. दिनकर बंदुके यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्यावेळी सगळीकडे घबराट पसरली होती. कारण तोवर महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता. पुढे शहरात दिवसाआड रुग्ण सापडू लागले. साहजिकच पिंपरी-चिंचवडकडे साऱ्या महाराष्ट्राचे वेधले गेले. महापालिकेची रुग्णालये सुसज्ज असली, तरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत होती. वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली होती. याच यंत्रणेतील एक म्हणजे दिनकर बंदुके. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागात चालक म्हणून बंदुके कार्यरत होते. कोरोनाच्या भीतीने अनेकजण घरी बसले; पण अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्‍यात घालून आजही ड्यूटी बजावत आहेत. ऍम्ब्युलन्स सेवा ही त्यातलीच. 58 वर्षीय बंदुके 30 जूनला सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीच्या अडीच महिने आधीच शहरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांना रात्रीचा दिवस करावा लागत होता. वय झालेले, बंदुके घरीही बसू शकले असते.

काही जण त्यांना तसा सल्लाही देत होते; पण त्यांच्यातल्या लोकसेवकाला हे मान्य झाले नाही. त्यांनी एकही दिवस सुटी न घेताही आपले काम सुरूच ठेवले. ही सेवा त्यांनी निवृत्तीच्या दिवसापर्यंत इमानेइतबारे बजावली. मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावणे ही जबाबदारीही त्यांच्यावर होती. अंत्यसंस्काराला काही मृतांचे नातेवाईक यायचे, तर काहींचे येत नव्हते. म्हणून मग देवाचं नाव घेऊन मृताला अखेरचा दंडवतही ते स्वत:च घालायचे.गेल्या 30 जूनला बंदूके सेवानिवृत्त झाले.मात्र शेवटच्या दिवसापर्यंत कार्यरत राहिले. इतक्या वर्षाच्या नोकरीत एकही रुग्ण दगावला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर किंवा रुग्णालयातून दुसरीकडे हलवताना रुग्ण आणि त्याचे नातेवाईक खूप घाबरून गेलेले असतात. यातूनही बिकट परिस्थिती ओढवू शकते, हे जाणून बंदूके संपूर्ण प्रवासभर रूग्णाला आधार देण्याचे काम करत राहिले. केसपेपर काढण्यापासून तपासणीसाठीच्या रुम दाखविण्याचे काम कोणीही न सांगता ते करत राहिले.

नोकरीच्या तीस वर्षांच्या कालावधीत वाहनचालक म्हणून आरोग्य विभाग, नगर सचिव, कचरा वाहतूक आदी विभागांत काम केले. रात्री-अपरात्री कॉल यायचा. झोपेत असले तरी डोळ्यावर पाणी मारायचं आणि हा कॉल पूर्ण करायचा, हेच व्रत त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत पाळले. कमीत कमी रजा, अत्यावश्‍यक प्रसंगी सुटीच्या दिवशीही कामावर हजर, प्रचंड जनसंपर्क, लोकांचा त्यांच्या कर्तव्यावर विश्‍वास याच त्यांच्या गुणांमुळे ते वरिष्ठांच्या कौतुकास कायम पात्र राहिले. महापालिकेचे गुणवंत कर्मचारीही ते ठरले. याबद्दल बंदुके यांना कॅडबरी डेअरी मिल्ककडून मनःपूर्वक धन्यवाद !

loading image