माऊलीचा आधार

जाहिरात
बुधवार, 29 जुलै 2020

वाट फुटेल तिकडे जायचं. भूक लागली, की दिसेल ते खायचं. अंगावर नीटनेटके वस्त्रे नाहीत, की तांब्याभर पाण्याची अंघोळ!..मनोरुग्ण महिलांची ही व्यथा. या व्यथेसरशी रस्त्यावर आयुष्य कंठणाऱ्या या महिलांतही आई असतेच ना!..या आईचीच माऊली बनलाय तो एक युवा डॉक्टर.

कॅडबरी डेअरी मिल्क पुणे: वाट फुटेल तिकडे जायचं. भूक लागली, की दिसेल ते खायचं. अंगावर नीटनेटके वस्त्रे नाहीत, की तांब्याभर पाण्याची अंघोळ!..मनोरुग्ण महिलांची ही व्यथा. या व्यथेसरशी रस्त्यावर आयुष्य कंठणाऱ्या या महिलांतही आई असतेच ना!..या आईचीच माऊली बनलाय तो एक युवा डॉक्टर. राजेंद्र धामणे असं या सुह्रदयीचं नाव. ते मूळचे नगरचे. डॉक्टरकीचे शिक्षण घेत असतानाच अनेक सामाजिक क्षेत्रात ते हिरिरीने सहभागी होत. डॉक्टर झाल्यावर प्रॅक्टिस सुरू केली.

मनाला मात्र समाजसेवेची ओढ. लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला. पत्नीही डॉ. सुचेता समाजसेवेत अग्रभागी. समाजातील उपेक्षित घटकांसाठी काहीतरी करायचे, असे दोघांनाही वाटायचे. मात्र नक्की काय करायचे हे निश्चित होत नव्हतं. एके दिवशी रोजचे काम संपवून घरी जाताना डॉ. राजेंद्र यांना रस्त्याच्या कडेला एक विदारक दृश्य दिसले. एक महिला स्वतःची विष्ठा खात असल्याचे पाहून ते हादरले. त्यांनी जवळ जाऊन त्या महिलेची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला काही सांगायच्या मनःस्थितीत नव्हती. तिला घरी घेऊन जाणेही अवघड. मात्र डॉ. सुचेता यांनी पुढाकार घेतला. त्या दिवशी दोघांनीही कामाची दिशा मिळाली. रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांना आसरा देत त्यांच्यावर उपचार करण्याचे त्यांनी ठरविले. अशा महिलांसाठी घर हाच आसरा असतो. त्याच्यासाठी जागेची मोठी अडचण होती. डॉ. राजेंद्र यांच्या वडिलांनी ही अडचण हेरली. त्यांनी तातडीने स्वतःची दहा गुंठे जागा मुलाला दिली. त्यावर मध्ये सुरू झाला माऊली प्रकल्प. डॉ. राजेंद्र सांगतात, रस्त्यावरील महिलांचे जिणं खूपच वाईट असते. त्यात संबंधित महिला मनोरुग्ण असेल तर तिचे हाल विचारूच नका.

रुग्ण महिलांना अनेकदा रस्त्यावर सोडले जाते. यामध्ये उच्च शिक्षित महिलाही असतात. त्यांची परिस्थिती फारच भयानक असते. मानसिक रुग्ण असल्याने त्या भीक मागत नाहीत. कारण त्यांना परिस्थितीचे भानच नसते. भूक लागली, की समोर दिसेल ते त्या खातात. अनेक महिलांची उपासमारही होते. यातील धक्कादायक बाब म्हणजे टक्के महिला शारीरिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या असतात. त्यातून त्यांना गर्भधारणाही होते. अनेकींना एचआयव्ही किंवा अन्य व्याधींचा सामना करावा लागतो. माऊली प्रकल्पाचे काम सुरू केल्यावर या महिलांवर उपचार करण्यास सुरुवात केली. अशा महिलांना माऊली केंद्रावर आणल्यावर सर्व तपासणी केली जाते. गर्भधारणा झालेल्या महिलांची विशेष काळजी घेऊन त्यांचे बाळंतपण केले जाते. सध्या केंद्रात अशी मुलेही आहेत. कायद्याने या मुलांना दत्तक देता येत नाही. काही मुले शाळेत जात आहेत.

उपचार करून महिला बऱ्या झाल्या की, त्यांना घरी सोडले जाते. मात्र अनेक महिलांचा त्यांचे कुटुंबीय स्वीकार करत नाहीत. त्या पुन्हा रस्त्यावर येतात. त्या रस्त्यावर येऊ नये म्हणून आता आम्ही महिलांना घरी सोडतच नाही. उपचारामुळे व्याधीमुक्त झालेल्या महिलांच्या आर्थिक निर्भरतेसाठी गोशाळा, डेअरी, हस्तकला आदी प्रकल्प सुरू केले आहेत. माझ्या कामात पत्नी डॉ. सुचेताचे बहुमोल सहकार्य आहे. आता मुलगा किरण एमबीबीएस झाला असून, तोही याच कामात सहभागी झाला आहे, असेही डॉ. राजेंद्र यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cadbury Dairy Milk thanks to Doctor Rajendra Dhamne for his outstanding work