esakal | तळबीडचा कक्ष ठरतोय रुग्णांचा आधार, 'आरोग्य'कडून गोरगरीबांवर मोफत उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Center

तळबीडने कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार केले.

तळबीडचा कक्ष ठरतोय रुग्णांचा आधार, 'आरोग्य'कडून गोरगरीबांवर मोफत उपचार

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत तळबीडमध्ये रुग्णांची संख्या वाढून ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. ग्रामस्थांना उपचार, बेडअभावी (Oxygen Bed) येणाऱ्या अडचणी पाहता ग्रामस्थांनी शासन मदतीची वाट न बघता लोकसहभागातून गावातच 30 बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला. श्री चंद्रसेन महाराज विलगीकरण कक्षात विनामूल्य सेवा मिळत असल्याने हा कक्ष गरीब व गरजूंसाठी आधार ठरला आहे. (Corona Center Of 30 Oxygen Bed Erected By The Citizens Of Talbeed Village Satara News)

तळबीडने कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाचे नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार केले. मात्र, सध्याच्या दुसऱ्या लाटेत शर्थीचे प्रयत्न करूनही येथील शंभरहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तळबीडकर हादरून गेले होते. आजही अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचा विचार करून तळबीडकरांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेत 30 बेडचा (Corona Center) विलगीकरण कक्ष सुरू केला. त्यासाठी लोकवर्गणीचीही मदत झाली. सध्या कोरोना रुग्णांसाठी तेथे नाष्टा, जेवणासह वैद्यकीय सेवा- सुविध देण्यात येतात. त्यासाठी उंब्रज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व सहकारी कार्यरत आहेत.

तळबीडमधील नागरिकांनी उभारलेला चंद्रसेन कोविड कक्षाचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्याचा रुग्णांना चांगला फायदा होत आहे. या कक्षासाठी आवश्‍यक ते सहकार्य करू.

-डॉ. संजय कुंभार, वैद्यकीय अधिकारी, उंब्रज

Corona Center Of 30 Oxygen Bed Erected By The Citizens Of Talbeed Village Satara News

loading image