'माणदेशी'ने घेतली काळजी! खटावात 3 हजार महिलांचे लसीकरण

Vaccination
Vaccinationesakal

वडूज (सातारा) : कोरोनावर मात करण्यासाठी कोविशिल्ड (Covishield Vaccine) या लसीचे खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) ३ हजार ४८४ महिलांना लसीकरण (Vaccination) करून माणदेशीने तालुक्यातील महिलांची काळजी घेतलीय. लसीकरणाबरोबरच प्रत्येक महिलेचे योग्य आदरातिथ्य, आरोग्याच्या काळजीबाबतचे मार्गदर्शन अन्‌ वृक्षसंवर्धनासाठी झाडाचे रोपही यावेळी महिलांना भेट देण्यात आले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात माणदेशी फाउंडेशन (Mandeshi Foundation) व बेल-एअर हॉस्पिटल यांच्यावतीने महिलांसाठी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचे मोफत लसीकरण करण्यात आले. तालुक्याच्या विविध भागांतील महिलांनी या लसीकरणात सहभाग नोंदविला.

Summary

कोरोनावर मात करण्यासाठी कोविशिल्ड (Covishield Vaccine) या लसीचे खटाव तालुक्यातील ३ हजार ४८४ महिलांना लसीकरण (Vaccination) करून माणदेशीने महिलांची काळजी घेतली आहे.

लसीकरणासाठी येणाऱ्या महिलांना आरोग्याविषयी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रेडिओ माणदेशी एफएमचे कलाकार विविध गाणी व उखाणे सादर करून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. लसीकरणाबरोबरच आरोग्य व वृक्षसंवर्धनाचा संदेशही यावेळी देण्यात आला.

Vaccination
अस्मानी संकटामुळे शेतकरी नैराश्याच्या गर्तेत अडकलाय
Mandeshi Foundation
Mandeshi Foundation

माणदेशीच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी महिलांशी संवाद साधून आरोग्य, कोरोना संसर्ग, लसीकरणाचे महत्व सांगत माणदेशी उद्योग समूहाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. परिसरातील छोट्या गावातून पन्नासहून अधिक महिला उपस्थित असतील, तर त्यांच्यासाठी माणदेशी फाउंडेशनतर्फे तीन स्वतंत्र लसीकरण बस उपलब्ध केल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, शाखाप्रमुख स्मिता टकले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com